बीएसस्सी तृतीय वर्षाचा पेपर सांगलीत फुटला | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बीएसस्सी तृतीय वर्षाचा
पेपर सांगलीत फुटला
बीएसस्सी तृतीय वर्षाचा पेपर सांगलीत फुटला

बीएसस्सी तृतीय वर्षाचा पेपर सांगलीत फुटला

sakal_logo
By

बीएस्सी तृतीय वर्षाचा
पेपर सांगलीत फुटला
फेरपरीक्षा मंगळवारी घेण्याचा निर्णय
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : शिवाजी विद्यापीठाच्या उन्हाळी सत्रातील परीक्षा सध्या सुरू आहेत. आज बीएस्सी तिसऱ्या वर्षातील ‘फिजिकल केमिस्ट्री’ या विषयाचा पेपर होता. सांगली जिल्ह्यातील एका केंद्रावर पेपर फुटल्याचे भरारी पथकाच्या निदर्शनास आले. त्यामुळे आजचा पेपर रद्द करून तो मंगळवारी (ता. २६) घेण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

विद्यापीठाच्या परीक्षेमागे लागलेले शुक्लकाष्ट संपण्याचे नाव घेत नाही. सुरुवातीला पेपरच्या स्वरूपावरून विद्यार्थ्यांनी आंदोलन केले. त्यानंतर विद्यापीठाने ऑफलाइन व बहुपर्यायी स्वरूपाची परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे परीक्षा महिनाभर पुढे गेल्या. त्यातच आज पेपरफुटीची घटना घडली. सांगली जिल्ह्यातील एका केंद्रावर भरारी पथक गेले असताना त्यांना परीक्षा सुरू होण्याआधीच केंद्रावर एके ठिकाणी उत्तरे लिहिल्याचे निदर्शनास आले. या प्रकाराची अधिक माहिती घेतली असता विद्यार्थ्यांना देण्यात येणारी प्रश्नपत्रिका आधीच काही मोबाईलवर असल्याचे पथकाच्या लक्षात आले. याचे गांभीर्य ओळखून त्यांनी विद्यापीठ प्रशासनाला कळवले. त्यामुळे फिजिकल केमिस्ट्री या विषयाचा आजचा पेपर रद्द करण्यात आला. हा पेपर मंगळवारी (ता. २६) होणार आहे; मात्र जे विद्यार्थी आज गैरहजर होते, त्यांना मंगळवारी देखील पेपर देता येणार नाही. केवळ आज उपस्थित असलेल्यांचा पेपर देता येणार आहे. पेपर फुटीचे प्रकरण परीक्षा प्रमाद समितीसमोर ठेवण्यात येईल. त्यानंतर प्रमाण समिती दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय घेईल.

प्रश्नपत्रिका कोड महत्त्वाचा
विद्यापीठाच्या प्रत्येक प्रश्नपत्रिका स्वतंत्र कोड आहे. ही प्रश्नपत्रिका डाउनलोड करताना या कोडचा उपयोग केला जातो. त्यामुळे प्रश्नपत्रिका कोणत्या केंद्रावर कधी डाउनलोड केली गेली, हे समजते. तसेच कोणाच्या मोबाईलवर डाउनलोड केली गेली आहे, याचीही माहिती मिळते. त्यावरून आता पेपर कोणी फोडला, हे तपासले जाणार आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10222 Txt Kolhapur1

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..