
संभाजीराजे ट्विट
संभाजीराजे यांचे संग्रहित छायाचित्र वापरावे...
भगतसिंह कोश्यारींना
राज्यपाल पदावरून हटवा
संभाजीराजे यांचे ट्वीट; मुंबईबाबत वाद्ग्रस्त वक्तव्य
कोल्हापूर, ता. ३० : भगतसिंह कोश्यारी यांना राज्यपाल पदावरून हटविण्याची व महाराष्ट्राची परंपरा जाणणारा व त्याबद्दल आदर असणारा योग्य व्यक्ती नेमावा, असे ट्विट युवराज संभाजीराजे छत्रपती यांनी आज केले. राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी मुंबईबाबत केलेल्या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर त्यांनी हे ट्विट केले.
संभाजीराजे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे, विद्यमान राज्यपाल महोदयांची जीभ वारंवार घसरते आहे. शिवरायांबद्दलचे वक्तव्य असो, महात्मा फुले व सावित्रीबाईंबद्दल पातळी सोडून बोलणे असो अथवा मुंबईबद्दल वक्तव्य करून मराठी माणसाची अस्मिता दुखावणे असो, हे महाशय केवळ राज्यपाल पदाचीच नव्हेतर महाराष्ट्राची प्रतिमा डागाळत आहेत. त्यामुळे राष्ट्रपती व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्काळ या विषयात गांभीर्याने लक्ष घालून महाराष्ट्राच्या ऐतिहासिक व सांस्कृतिक परंपरेचे भान असणारा व त्याबद्दल आदर असणारा एखादा सुयोग्य व्यक्ती महाराष्ट्राचा राज्यपाल म्हणून नियुक्त करावा.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10248 Txt Kolhapur
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..