
महसूल निवेदन
महसूल विभागाचा
आकृतीबंध मंजूर करा
राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे निवेदन
कोल्हापूर, ता. ४ : महसूल विभागाचा आकृतीबंध मंजूर करावा, महसूल सहायकाची रिक्त पदे भरण्याचे आदेश व्हावेत, अशी मागणी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेतर्फे मुख्यमंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. निवेदनाची प्रत आज निवासी उपजिल्हाधिकारी दत्तात्रय कवितके यांच्याकडे शिष्टमंडळाने दिली.
निवेदनात म्हटले आहे, महसूल विभागात मोठ्या प्रमाणात सद्यस्थितीत रिक्त पदे असून महसूल सहायक व अव्वल कारकून यांच्याकडे एकापेक्षा जास्त पदाचा कार्यभार आहे. परिणामी महसूल कर्मचाऱ्यांना मोठ्या मानसिक तणावा सामोरे जावे लागत आहे. पुरवठा विभागात कार्यरत असलेली महसूल विभागातील कर्मचारी तातडीने महसूल विभागाच्या मूळ आस्थापनेवर वर्ग करावी. पुरवठा विभागाच्या २ जुलै २०२२ च्या सुधारित आकृतीबंधानुसार पुरवठा विभागात कार्यरत असणाऱ्या वर्ग तीन वर्ग चारच्या सर्व महसूल कर्मचारी यांच्या सेवा मूळ महसूल विभागाकडे वर्ग कराव्यात. यासाठी महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची ऑनलाईन सभा झाली आहे. निवेदन महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्य सचिव, अपर मुख्य सचिव यांच्यासह अन्न व नागरी पुरवठा विभागाचे अपर मुख्य सचिव यांना दिले. शिष्टमंडळात जिल्हा महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष सुनील देसाई, सरचिटणीस अखिल शेख, कोषाध्यक्ष नारायण पाटील, अश्विनी कारंडे, संदीप पाटील, संतोष वाळके, ॲलेक्स डिसुजा, विनायक लुगडे आदींचा समावेश होता.
Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10260 Txt Kopcity Today
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..