मुस्लिम फौडेशन फॉर रेनेसांला साजिद मुरसल यांच्याकडून एक हजार स्क्वेअर फूट बेसमेंट देणगी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मुस्लिम फौडेशन फॉर रेनेसांला साजिद मुरसल  यांच्याकडून एक हजार स्क्वेअर फूट बेसमेंट देणगी
मुस्लिम फौडेशन फॉर रेनेसांला साजिद मुरसल यांच्याकडून एक हजार स्क्वेअर फूट बेसमेंट देणगी

मुस्लिम फौडेशन फॉर रेनेसांला साजिद मुरसल यांच्याकडून एक हजार स्क्वेअर फूट बेसमेंट देणगी

sakal_logo
By

41129
कोल्हापूर : साजीद मुरसल यांनी मालकी हस्तांतरणचे पत्र मुस्लिम फाउंडेशन फॉर रेनेसा संस्थेच्या रेहाना मुरसल, मलिका शेख यांच्याकडे सुपूर्द केले. यावेळी अॅड. ए. बी मुरसल, नासीर मोमीन, साजीद मुरसल, रेहाना हु. मुरसल, मलिका शेख, उमरफारूक शेख, मतीन मनगोळी, शौकत मुतवल्ली, प्रा. झाकीर सनदे.

मुस्लिम फाउंडेशन फॉर रेनेसांला
साजिद मुरसल यांच्याकडून देणगी

इमारतीचे पझेशन लेटर पदाधिकाऱ्यांना सुपूर्द

कोल्हापूर, ता. ५: येथील साजिद इकबाल मुरसल यांनी शहरातील स्वमालकीचा एक हजार स्केअर फुटाचे बेसमेंट सेंटर मुस्लिम फाउंडेशन फॉर रेनेसांसाठी देणगी म्हणून अर्पण केले. काल झालेल्या सत्कार कार्यक्रमात त्यांनी इमारतीचे पझेशन लेटर पदाधिकाऱ्यांना सुपूर्द केले. संस्थेतर्फे ॲड. मुरसल, डॉ. जाकीर सन्दे, नासीर मोमीन, रशीद दाढीवाले यांनी स्वीकार केला.
सिकंदर नदाफ म्हणाले, "साजीद मुरसल यांनी प्रत्यक्ष कृतीतून मनाचा मोठेपणा दाखवून दिला आहे."
हुमायून मुरसल म्हणाले की, संस्थेतर्फे सर्व समाजातील मुला-मुलींना, स्त्रियांसाठी मोफत डिजिटल लिटरसीचे शिक्षण दिले जाते. तरुणांसाठी कौशल्य विकासाचे कोर्सेस चालविले जाणार आहेत. शिक्षणाचा दर्जा उंचावून मुलांना उच्च शिक्षण मिळण्यासाठी विशेष उपक्रम राबविले जाणार आहेत.
मलिका शेख, रेहाना मुरसल, मतीन मनगोली, सिकंदर देसाई, डॉ. खलील मुल्ला, मुसा शेख उपस्थित होते. प्रास्ताविक हाजी शौकत मुतवल्ली यांनी केले. सूत्रसंचालन अब्दुल मजीद बिडीवाले यांनी केले. निहाल पटेल यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10267 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
go to top