यिन संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन संवाद
यिन संवाद

यिन संवाद

sakal_logo
By

यिन लोगो

कोल्हापूर : सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) कॉमर्स कॉलेजमध्ये आयोजित यिन संवाद कार्यक्रमात अभिनेता प्रथमेश परब, अजिंक्य राऊत, अक्षय केळकर, अभिनेत्री प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे.

कष्टातूनच आयुष्याला आकार मिळेल
प्रथमेश परब; कॉमर्स कॉलेज, ‘सायबर‘मध्ये यिन संवाद कार्यक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ११ : सातत्यपूर्ण प्रयत्न यशस्वी होण्यासाठी आवश्यक आहेत. तरुणाईने अविरतपणे स्वप्नांचा पाठलाग करताना, कष्टाची तयारी ठेवावी. तरच आयुष्याला आकार मिळेल, असा विश्वास अभिनेता प्रथमेश परब याने आज येथे व्यक्त केला. सकाळ माध्यम समूहाच्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) आयोजित यिन संवाद कार्यक्रमात तो बोलत होता. कॉमर्स कॉलेज व सायबरमध्ये कार्यक्रमाचे आयोजन केले होते.
प्रथमेश म्हणाला, ‘‘आयुष्य सुंदर आहे. ते त्याच पद्धतीने जगता आले पाहिजे. महाविद्यालयीन आयुष्यात खूप स्वप्नं असतात. ती पूर्ण करण्यासाठी सातत्यपूर्ण प्रयत्नांची आवश्यकता आहे. हे वय वाचनाचे आणि काहीतरी करून दाखविण्याचे आहे. त्यामुळे तरुणांनी याच वयात ध्येय निश्चित करायला हवे.’’
अभिनेता अजिंक्य राऊत म्हणाला, ‘‘क्षेत्र कोणतेही असो तेथे संघर्ष करावाच लागतो. अभिनयाचे क्षेत्रात करिअर करताना खूप काही शिकायला मिळते. आयुष्याचे नवनवे कंगोरे येथे अनुभवायला मिळतात. प्रत्येक भूमिका वेगवेगळी असते. ती अर्थ समजून घेऊन काम करावे लागते.’’
अभिनेता अक्षय केळकर, अभिनेत्री प्रणाली भालेराव, भूमिका कदम, कोमल बोडखे यांच्यासह ‘कॉमर्स’चे प्राचार्य डॉ. व्ही. ए. पाटील, उप प्राचार्य डॉ. बी. टी. नाईक, स्वप्‍नील करले, प्रा. आर. एस. नाईक, सायबरचे समाजकार्य विभाग प्रमुख डॉ. दीपक भोसले, डॉ. टी. व्ही. जी. शर्मा, डॉ. एस. एस. आपटे, डॉ. एस. पी. राजपूत, डॉ. कालिंदी रानभरे, डॉ. उमाकांत वळवी, प्रा. उर्मिला चव्हाण, डॉ. शुभांगी पाटील, प्रा. सागर ठाकूर, प्रा. पूनम माने, प्रा. महेंद्र जनवाडे, प्रा. शर्वरी काटकर, संचालक डॉ. एस. पी. रथ, प्रशासकीय अधिकारी विनायक साळोखे उपस्थित होते. प्रियांका सुर्वे हिने सूत्रसंचालन केले. यिनचे सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड, यिन मुख्यमंत्री पार्थ देसाई, महापौर ऋतुजा पाटील यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10301 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..