प्रदर्शन सुरू | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रदर्शन सुरू
प्रदर्शन सुरू

प्रदर्शन सुरू

sakal_logo
By

43621

उलगडा स्वातंत्र्यसंग्रामाचा इतिहास
राजाराम महाविद्यालय, स्वातंत्र्य संग्राम संकलन ट्रस्टततर्फे प्रदर्शन

कोल्हापूर, ता. १६ : १८५७ चा उठाव, नागरी व आदिवासी उठाव, क्रांतिकारी चळवळी व महात्मा गांधी यांच्या जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या प्रदर्शनातून देशाच्या स्वातंत्र्यासाठी घडलेल्या घटनांचा येथे उलगडा झाला.
राजाराम महाविद्यालयातील इतिहास विभाग, राष्ट्रीय छात्र सेना व राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि स्वातंत्र्य संग्राम संकलन ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ अंतर्गत भारतीय स्वातंत्र्य चळवळीशी निगडीत दुर्मिळ छायाचित्र व साहित्याचे प्रदर्शनास येथे सुरवात झाली. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे प्रदर्शन भरवले आहे.
जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांच्या हस्ते त्याचे उद् घाटन झाले. ते म्हणाले, "स्वातंत्र्यसंग्रामाची माहिती देणारे छायाचित्र व साहित्य प्रदर्शन नव्या पिढीला स्वातंत्र्य सेनानींच्या बलिदानाची व स्वतंत्र भारत उभा करण्यासाठी करण्यात आलेल्या असीम त्यागाची त्यागाची जाणीव करुन देणारे आहे. प्रदर्शन आवर्जून पाहण्यासारखे आहे."
यावेळी स्वातंत्र्य सैनिक व इतिहास संशोधक (कै.) बा. बा. महाराज यांनी व त्यांच्या कुटुंबीयांनी अनेक वर्षांच्या अथक प्रयत्नातून जमा केलेल्या संग्रहाबद्दल त्यांनी कौतुक केले. इतिहास विभाग प्रमुख डॉ. ऋषिकेश दळवी यांनी प्रदर्शन १७ ऑगस्टपर्यंत सकाळी १० ते सायंकाळी ८ वाजेपर्यंत खुले आहे असल्याचे सांगितले.
राजाराम महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. सुनेत्रा महाराज–पाटील, कार्यक्रम अधिकारी डॉ. व्ही. एम. देशमुख, स्वातंत्र्य संग्राम संकलन ट्रस्टचे अध्यक्ष राजेश महाराज उपस्थित होते.

चौकट
वैशिष्ट्यपूर्ण मांडणी
दुर्मिळ छायाचित्रे, पत्रव्यवहार, शस्त्र व इतर वस्तूंसह लोकमान्य टिळक, महात्मा गांधी यांच्या रक्षा प्रदर्शनात ठेवण्यात आल्या आहेत. सुभाष चंद्र बोस व आजाद हिंद फौजेच्या कार्याची वैशिष्ट्यपूर्ण मांडणी करण्यात आली आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10323 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..