वीज विधेयक होळी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वीज विधेयक होळी
वीज विधेयक होळी

वीज विधेयक होळी

sakal_logo
By

४४०६०
वीज विधेयकाची बिंदू चौकात होळी
केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी; अखिल भारतीय किसान सभेतर्फे निषेध
कोल्हापूर, ता. १८ : मोदी सरकारने संसदेत मांडलेल्या ''वीज अधिनियम २०२२'' विधेयकाची
अखिल भारतीय किसान सभेतर्फे आज बिंदू चौकात होळी करण्यात आली. वीज खाजगीकरणाचा धिक्कार असो, जनताविरोधी वीज विधेयक हाणून पाडा, शेतकरीविरोधी केंद्र सरकारचा धिक्कार असो, शेतकरी एकजुट जिंदाबाद अशा घोषणा देण्यात आल्या.
कृषी कायदेविरोधात ऐतिहासिक आंदोलन मागे घेताना सरकारने शेतकरी व जनता विरोधी प्रस्तावित वीज विधेयक देखील न आणण्याचे आश्वासन दिले होते. किमान हमी भावाच्या विधेयक न आणून विश्वास घात केल्याप्रमाणे वीज विधेयक देखील आणत संयुक्त किसान मोर्चाच्या पाठीत सुरा खुपसला आहे. त्याविरोधात च्या वतीने देशभर वीज विधेयकाची होळी केली जात आहे.
यावेळी जिल्हासचिव नामदेव पाटील यांनी नवीन कायद्याने भारतातील वीज क्षेत्राचे नियमन करण्याचे सर्व अधिकार केंद्र सरकार त्यांच्याकडे घेत आहे, असे सांगितले. राज्य कौन्सिल सदस्य दिनकर सूर्यवंशी यांनी विधेयकातील सेक्शन-६२ नुसार विजेचे दर जास्त किंवा कमी करण्याचे अधिकार खाजगी उद्योजकांना देण्यात येणार असल्याचा आरोप करत भांडवलदारांना खुश करण्याचा डाव सुरू असल्याचे स्पष्ट केले.
जिल्हाध्यक्ष वाय. एन. पाटील, जिल्हा उपाध्यक्ष गिरीश फोंडे, संजय पाटील, सुमन पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी बाळासाहेब पाटील, मधुकर मांगुरे, बाबा ढेरे, भिकाजी कुंभार, मारूती नलवडे, अनिल चव्हाण, प्रशांत आंबी, सतिशचंद्र कांबळे, रघुनाथ कांबळे, हरिश कांबळे, दिलदार मुजावर, धीरज कठारे,निलेश असबे, सुनिल कोळी, श्रीकांत कोळी उपस्थित होते.