विद्यार्थी घेणार एकाच वेळी दोन पदव्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थी घेणार एकाच वेळी दोन पदव्या
विद्यार्थी घेणार एकाच वेळी दोन पदव्या

विद्यार्थी घेणार एकाच वेळी दोन पदव्या

sakal_logo
By

विद्यापीठ लोगो

एकाच वेळी शिका
विविध अभ्यासक्रम
नव्या शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांना संधी
कोल्हापूर, ता. १९ : विद्यापीठ अनुदान आयोगाने नव्या राष्ट्रीय शिक्षण धोरणानुसार विद्यार्थ्यांना एकाच वेळी अनेक कौशल्य संपादन करण्यासाठी तयार केलेल्या मार्गदर्शक तत्त्वानुसार विद्यार्थ्यांना शिवाजी विद्यापीठात एकाच वेळी पदविका, दोन पदवी किंवा पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेता येणार आहे. हा नियम २०२२ - २३ शैक्षणिक वर्षांतील अभ्यासक्रमांसाठी लागू आहे. विद्यार्थ्यांना दोन पूर्ण वेळ पदवी अभ्यासक्रमाचे शिक्षण एकाच वेळी घेण्याची परवानगी नव्हती. पूर्णवेळ पदवीचे शिक्षण घेताना पदविका किंवा अर्धवेळ पदवीचे शिक्षण घेता येत होते. आता एकाचवेळी दोन पूर्ण वेळ अभ्यासक्रमांना प्रवेश घेता येईल. त्यामुळे एकाचवेळी दोन पदविका / पदवी, पदव्युत्तर पदवी किंवा एक पदवी आणि पदव्युत्तर पदवी, पदविका आणि पदवी असे वेगवेगळे पर्याय उपलब्ध होतील.
पदव्युत्तर शिक्षण घेताना विद्यार्थ्याला दुसऱ्या विषयाच्या पदवी अभ्यासक्रमाची ही निवड करता येईल. विद्यापीठ अनुदान आयोगानुसार विषय निवडण्याची कोणतीही सक्ती विद्यार्थ्यावर असणार नाही. हा निर्णय पीएच.डी.आणि एम.फिल.साठी लागू नाही.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10335 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..