जिल्ह्यात श्रावण सरींचे रिमझिम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्ह्यात श्रावण सरींचे रिमझिम
जिल्ह्यात श्रावण सरींचे रिमझिम

जिल्ह्यात श्रावण सरींचे रिमझिम

sakal_logo
By

जिल्ह्यात श्रावण सरींची रिमझिम
धरणातील साठ्यात वाढ; दिवसभर ऊन-पावसाचा खेळ
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २० : जिल्ह्यामध्ये गेल्या चार दिवसांपासून सुरू असणारा ऊन-पावसाचा खेळ आजही रंगला शहरासह सर्व तालुक्यात श्रावण सरींची रिमझिम सुरूच होती. जिल्ह्यातील लघु व मध्यम प्रकल्प पूर्ण क्षमतेने भरले असून मोठ्या धरणातही ९० टक्क्यांपेक्षा जास्त पाणीसाठा आहे.
ऑगस्टच्या सुरुवातीलाच पावसाची दमदार सुरुवात झाली. सलग चार ते पाच दिवस पडलेल्या पावसामुळे पुराचा धोकाही वाढला होता. मात्र, त्यानंतर पावसाचा जोर ओसरला. पुराचे पाणी पुन्हा नदीपात्रात गेले. गेल्या चार दिवसांत श्रावणातील ऊन-पावसाचा खेळ सर्वत्र पाहायला मिळाला. आज सकाळी शहरात सूर्यदर्शन झाले. नऊ वाजण्याच्या सुमारास पुन्हा पावसाला सुरुवात झाली. एक-दोन मोठ्या सरी, त्यानंतर पुन्हा ऊन, थोड्या वेळाने पुन्हा पाऊस असा हा खेळ दिवसभर सुरू राहिला. धरण क्षेत्रातही पावसाची रिपरिप सुरूच आहे. त्यामुळे धरणे भरत आली आहेत. शनिवारी रात्री नऊ वाजता राजाराम बंधारा येथे नदीची पाणीपातळी वीस फूट दहा इंच इतकी होती अद्याप चौदा बंधारे पाण्याखाली आहेत. चिकोत्राबद्दल प्रकल्प सकाळी सात वाजता पूर्ण क्षमतेने भरला.

धरणातील साठा (आकडे टीएमसीत)
राधानगरी - ८.२५ (९८.७५ टक्के)
तुळशी - ३.४५ (९९.५२ टक्के)
दूधगंगा - २२.८३ (९१.६९ टक्के)
वारणा - ३१.४५ (९१.६९ टक्के)