महसूल मंत्री विखे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महसूल मंत्री विखे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर
महसूल मंत्री विखे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर

महसूल मंत्री विखे पाटील कोल्हापूर दौऱ्यावर

sakal_logo
By

44588
महसूल मंत्री विखे-पाटील
आज कोल्हापूर दौऱ्यावर
कोल्हापूर : राज्याचे महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील आज कोल्हापूर दौऱ्यावर येणार आहेत. वारणानगर आणि जिल्हाधिकारी कार्यालय ते अधिकाऱ्यांची बैठक घेतील. मंत्री विखे पाटील यांचे सकाळी नऊ वाजता मुंबईहून कोल्हापूर विमानतळावर आगमन होईल. त्यानंतर ते वारणानगर येथील विश्रामगृहावर जातील. तिथे पशुपालन व दुग्ध व्यवसाय यासंदर्भात अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. तेथून साडेबारा वाजता कोल्हापुरातील शासकीय विश्रामगृहावर येतील. तेथे महसूल अधिकाऱ्यांची बैठक घेतील. त्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास खासदार धनंजय महाडिक यांच्या घरी जाणार आहेत. दुपारी अडीच वाजता श्री अंबाबाईचे दर्शन घेऊन ते विमानतळावर जातील. दुपारी चारच्या सुमारास विमानाने मुंबईकडे रवाना होतील.