पा ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पा ७
पा ७

पा ७

sakal_logo
By

44719
कोल्हापूर : कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण विकास मंच व मोहनदास करमचंद गांधी विचार मंचतर्फे नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने आयोजित शिक्षण विचार परिषदेत बोलताना ज्येष्ठ शिक्षण तज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर. शेजारी प्राचार्य जी. पी. माळी, अतुल दिघे, ॲड. रविराज बिरजे.

राष्ट्रीय शिक्षण धोरणात खूप विसंगती

डॉ. हिर्डेकर : कर्मवीर भाऊराव पाटील, गांधी विचार मंचतर्फे शिक्षण विचार परिषद

कोल्हापूर, ता. २१ : राष्ट्रीय शैक्षणिक धोरण सर्वसामान्य विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचे दरवाजे बंद करणारे धोरण आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ डॉ. बी. एम. हिर्डेकर यांनी आज येथे केले. कर्मवीर भाऊराव पाटील शिक्षण विकास मंच व मोहनदास करमचंद गांधी विचार मंचतर्फे
नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरणाच्या अनुषंगाने आयोजित ''शिक्षण विचार परिषद- १’ मध्ये ते बोलत होते. ‘नवीन शिक्षण धोरण आणि महात्मा गांधींचा शिक्षण विचार (नई तालीम)’ विषयावर त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. चित्रदुर्ग मठात त्याचे आयोजन केले होते.

डॉ. हिर्डेकर म्हणाले, ‘‘राष्ट्रीय शिक्षण धोरणात मोठ्या घोषणा केल्या आहेत. धोरणाचा वाड्यावस्त्यांवरील शिक्षणाशी कनेक्ट नाही. त्यात विसंगती खूप असून, हे धोरण शिक्षण संस्थांना दिल्या जाणाऱ्या निधीबद्दल बोलत नाही. महाविद्यालयांचे क्लस्टर करून कुलगुरू नेमले जाणार आहेत. ज्या होतकरू शिक्षण चालकांनी संस्था उभ्या केल्या, त्या मोडकळीस आणण्याचा धोका आहे. ग्रामीण भागातील ज्या मुलांना शहरात येऊन शिक्षण घेणे परवडत नाही.
माजी प्राचार्य डॉ. जी. पी. माळी म्हणाले, ‘‘शिक्षण क्षेत्रात शिक्षण महर्षी तयार न होता, शिक्षण सम्राट तयार झाले आहेत. ‘नो डोनेशन नो अॅडमिशन'' असे समीकरण त्यांना आकाराला आणले आहे. ज्याच्याकडे पैसा त्याला शिक्षण, देण्याचे धोरण राबवले जाणार आहे.’’
प्रा. अतुल दिघे म्हणाले, ‘‘पूर्वी प्रस्थापित शिक्षणापासून संपत्ती निर्माण करणाऱ्या घटकाला शिक्षणाचा अधिकार नाकारला गेला. वस्तुतः तो उत्पादक होता. त्यानंतर कारकून तयार करणारे शिक्षण अस्तित्वात आले. समाजाच्या पुननिर्मितीचा प्रयत्न महात्मा गांधी यांनी केला. अॅड. रविराज बिरजे-पाटील यांनी शिक्षण मूलभूत अधिकार असल्याचा निकाल १९९२ ला सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. त्यानुसार ६ ते १४ वयोगटांतील मुलांना शिक्षण सक्तीचे व मोफत केले आहे. मग १४ वयोगटांवरील मुलांचे काय, असा प्रश्न उपस्थित केला.
या वेळी राजशेखर तंबाखे, चंद्रशेखर बटकडली, बाबूराव तारळी, उमेश पोवार, वसंतराव मुळीक, डॉ. अनमोल कोठाडिया, विक्रम भोसले, नीलेश सुतार, सुभाष पाटील, सूरज पुरी, यश आंबोळे, कार्तिक पाटील उपस्थित होते. बसव केंद्र, मावळा कोल्हापूर, संभाजी ब्रिगेड, जिजाऊ ब्रिगेड यांनी सहकार्य केले. अभिषेक पाटील यांनी सूत्रसंचालन केले.
.............
चौकट
लोकांचे लोकांसाठी
शिक्षणचा ठराव
''लोकांचे राष्ट्रीय शिक्षण धोरण'' असा मसुदा तयार करून सर्वसमावेशक आणि लोकांचे लोकांसाठी असणारे शिक्षण धोरण मांडण्याचा ठराव परिषदेत मान्य करण्यात आला.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10348 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..