महावितरण प्राणांतिक अपघाताच्या घटना | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण प्राणांतिक अपघाताच्या घटना
महावितरण प्राणांतिक अपघाताच्या घटना

महावितरण प्राणांतिक अपघाताच्या घटना

sakal_logo
By

महावितरण लोगो...

४९ घटनांत महावितरण जबाबदार
जिल्ह्यात ५ वर्षांत मानवी प्राणांतिक विद्युत अपघाताच्या १९३ घटना

संदीप खांडेकर : सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : जिल्ह्यात २०१७ ते २०२२ दरम्यान मानवी प्राणांतिक विद्युत अपघाताच्या १९३ घटना घडल्या आहेत. त्यातील ४९ घटनांत महावितरणला जबाबदार धरले असून, २५ प्रकरणांत ९२ लाख रुपयांची नुकसानभरपाई संबंधितांच्या नातेवाईकांना दिली आहे.
महावितरणचे कर्मचारी विद्युत यंत्रणा सक्षम राहावी, यासाठी सतर्क असतात. कोठे काही बिघाड झाला, तर तत्काळ त्याची दुरुस्ती करतात. कोणतीही जीवित व वित्तहानी होऊ नये, याची दक्षता घेतात. तरीही काही घटनांत महावितरण दोषी ठरते. एखादा विद्युत यंत्रणेतील रोहित्र अथवा वीज खांब, स्टे वायरच्या संपर्कात आल्याने त्याला जीव गमवावा लागतो. पुढे नातेवाईकांकडून महावितरणच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते.
जिल्ह्यात मागील पाच वर्षांत घडलेल्या घटनांचा आढावा घेता विद्युत निरीक्षकांच्या अहवालात ४९ प्रकरणांत महावितरणवर ठपका ठेवला आहे. त्यातील २५ प्रकरणांत ९२ लाख रुपये नुकसान भरपाई आदा केली आहे. सात प्रकरणे मंजूर असून, नुकसान भरपाई देण्याची प्रक्रिया सुरू आहे. विशेष म्हणजे १७ प्रकरणांपैकी सात मागणी अर्ज, आठ कोर्ट केस व दोन अपूर्ण कागदपत्रांच्या कारणांमुळे प्रलंबित आहेत. मानवी प्राणांतिक विद्युत अपघाताच्या घटना घडू नयेत, यासाठी महावितरण कसोशीने प्रयत्न करत असल्याचे सांगण्यात आले.
.........
चौकट...
घटना घडल्यानंतर...
शव विच्छेदन अहवाल, पोलिस पंचनामा, मृत्यू प्रमाणपत्र, विद्युत निरीक्षक अहवाल, वारस प्रमाणपत्र, इतर वारसांचे ना हरकत, विमा मागणी केले नसल्याचे शपथपत्र संबंधित व्यक्तीच्या नातेवाईकाला सादर करावे लागते. त्यानंतरच महावितरण जबाबदारी स्वीकारून नुकसान भरपाई देते.
.........
चौकट...
* वीज यंत्रणेपासून सावधान कसे राहावे?
- विजेच्या तारांखाली, वीज खांब,
रोहित्राजवळ थांबणे टाळावे
-विजेच्या तारा, वीज खांब, स्टे वायर,
वितरण रोहित्रासह विद्युत यंत्रणेतील
कोणत्याही उपकरणांना स्पर्श करणे टाळा
- पाऊस चालू असताना विजेचा पंप
चालू अथवा बंद करणे शक्यतो टाळा.
-गुरे-ढोरे विजेच्या खांबास, खांबाजवळ वा
तारेखाली असलेल्या झाडाला बांधू नका
- फ्रीज, कुलर, मिक्सर इस्त्री, गिझर, टेबल फॅन
ही विद्युत उपकरणे सुस्थितीत असल्याची खात्री करा
- शेतात ओल्या हाताने मोटार चालू अथवा बंद करू नका

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10359 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..