महावितरण आवाहन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महावितरण आवाहन
महावितरण आवाहन

महावितरण आवाहन

sakal_logo
By

गणेश मंडळांसाठी
वीज जोडणीची सुविधा

कोल्हापूर, ता. २६ : महावितरणकडून गणेश मंडळांना सवलतीच्या दरात तात्पुरत्या स्वरुपात वीज जोडणीची सुविधा उपलब्ध केली आहे. गणेश मंडळांनी अधिकृत वीज जोडणीद्वारे विजेचा वापर करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
गणेशोत्सव काळात ग्राहकांना दर्जेदार, अखंडित व सुरळीत वीज पुरवठा मिळावा, यासाठी वीज यंत्रणेच्या देखभाल दुरुस्तीची आवश्यक कामे महावितरणकडून केली आहेत. गणेश मंडळांना तात्पुरत्या स्वरूपातील वीज जोडणीसाठी मंडळ नोंदणी प्रमाणपत्र, स्थानिक स्वराज्य संस्था मंडप परवानगी, पोलिस परवाना, वीज मागणी अर्ज, वीज संच मांडणी तपासणी अहवाल व बँक खाते पासबुक छायांकित प्रत ही कागदपत्रे आवश्यक आहेत. अनाधिकृत वीज वापर करणाऱ्या गणेश मंडळांवर नियमानुसार कारवाई करण्यात येईल. वीजसंच मांडणी अधिकृत ठेकेदारांकडून करावी.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10369 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..