बाजार समिती 48 व्या क्रमांकावर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बाजार समिती 48 व्या क्रमांकावर
बाजार समिती 48 व्या क्रमांकावर

बाजार समिती 48 व्या क्रमांकावर

sakal_logo
By

लोगो


बाजार समिती राज्यात ४८ वी
शासनाचा उपक्रम; राज्यातील ३०५ बाजार समित्यांचे गुणात्मक दर्जा मूल्यांकन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १ : बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन उपक्रमांतर्गत राज्यातील ३०५ बाजार समित्यांचे नुकतेच गुणात्मक दर्जा मूल्यांकन केले. यात कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला राज्यात ४८ व्या क्रमांकावर, तर विभागात चौथ्या क्रमांकावर व जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर स्थान मिळाले आहे. तसे पत्र जिल्हा निबंधक कार्यालयात प्राप्त झाले आहे.
मूल्यांकनामुळे बाजार समित्यांची सक्षमता पाहून शेतकऱ्यांना तेथे शेतीमाल खरेदी-विक्रीसाठी आणता येणे सोयीचे होणार आहे. पणन विभागामार्फत स्मार्ट प्रकल्प राबविण्यात येणार आहे. त्यासाठीच बाजार समितीची सद्यस्थिती काय आहे, हे समजून घेण्यासाठी शासनाने बाजार समितीचे मूल्यांकन केले होते. त्यासाठी शहर निबंधकामार्फत बाजार समितीमध्ये असलेल्या सुविधा, शेतीमालाची आवक-जावक, सौद्यांसाठी असलेले एकूण अडत दुकाने, शेतीमाल वाहतूक सुविधा, शेतीमाल खरेदी-विक्री उलाढाल, आवक व शिल्लक आदी बाबतची लेखी माहिती घेतली होती. या सुविधा ज्या दर्जाच्या आहेत, त्यानुसार एकूण २०० पैकी गुण देण्यात येणार होते. त्यानुसार कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीला राज्यस्तरावर १२१ गुण मिळाले आहेत. कोल्हापूर, सांगली, सातारा या विभागात कोल्हापूर बाजार समिती चौथ्या क्रमांकावर, तर जिल्ह्यात पहिल्या क्रमांकावर आहे.
बाजार समितीचे सचिव जयवंत पाटील यांच्याशी संपर्क साधला असता ते म्हणाले, ‘‘शेतीमालाची आवक होते, सौदेही होतात, जास्तीत जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न आहे. जिथे या सेवा अधिक सक्षम करणे शक्य आहे, तेथे या सुविधा अधिक सक्षम करून बाजार समितीचा विकास अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा आमचा मनोदय आहे.’’

अशीही संभ्रमावस्था
स्मार्ट प्रकल्पाचे नेमके स्वरूप काय आहे व त्याचा या मूल्यांकनाशी काय संबंध आहे व मिळालेले गुण याचा वापर कशासाठी करावा, याविषयी बाजार समितीशी संबंधित घटकांना नेमकी माहिती नसल्याने संभ्रमावस्था आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10393 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..