यिन संवाद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

यिन संवाद
यिन संवाद

यिन संवाद

sakal_logo
By

कोल्हापूर : ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्क’तर्फे (यिन) विवेकानंद महाविद्यालयात आयोजित ‘यिन संवाद’ उपक्रमात बोलताना निर्माता व गायक अवधूत गुप्ते, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, दिग्दर्शक विशाल देवरुखकर, अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेत्री विदुला चौगुले, अभिनेता प्रतीक लाड व सुमंत शिंदे.
------------------------------------------

ठेच हीच भविष्यातील झेप असते
---
अवधूत गुप्ते; ‘सकाळ माध्यम समूहा’च्या ‘यिन’तर्फे ‘यिन संवाद’ उपक्रम
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २ : आयुष्यात लागलेली ठेच हीच भविष्यातील झेप असते. हार न मानता चालत राहा आणि भरपूर ज्ञान कमवा. स्वतःची स्वप्ने साकार करताना चांगला नागरिक बना, असे आवाहन निर्माता व गायक अवधूत गुप्ते यांनी आज येथे केले.
‘सकाळ माध्यम समूहा’च्या यंग इन्स्पिरेटर्स नेटवर्कतर्फे (यिन) महावीर महाविद्यालय, विवेकानंद महाविद्यालय, सायबर कॉलेज व सायबर महिला महाविद्यालयातर्फे आयोजित ‘यिन संवाद’ उपक्रमात ते बोलत होते. दिग्दर्शक विशाल देवरुखकर, अभिनेता पार्थ भालेराव, अभिनेत्री विदुला चौगुले, अभिनेता प्रतीक लाड व सुमंत शिंदे उपस्थित होते.
गुप्ते म्हणाले, की ‘यिन’चे संस्कार विसरू नका. देशाचा चांगला नागरिक बनण्याची जबाबदारी तुमची आहे. तुमच्यातील नेतृत्व गुण वाढीस लागण्यासाठी ‘यिन’ वैविध्यपूर्ण उपक्रमांतून तुम्हाला घडवत आहे. चांगला नागरिक बनून देशसेवेसाठी तत्पर राहा. महाविद्यालयीन काळात पाहिलेली स्वप्ने साकार करण्यासाठी जिद्द सोडू नका. आयुष्यात कधी ठेच लागली तर नाउमेद न होता पुन्हा आव्हानाला प्रत्युत्तर देण्यासाठी सज्ज व्हा.
ते म्हणाले, की कोल्हापूरच्या मातीत रांगडेपणा आहे. इथले लोक एकमेकांना मदत करणारे आहेत. ‘जगात भारी कोल्हापुरी’ त्यामुळेच म्हटले जाते. माझे शिक्षण मुंबईत झाले असले तरी कोल्हापूरच्या मातीची माझी ओढ वेगळीच आहे. शिवाजी पेठेत तर मी काही काळ वास्तव्यालाच होतो. लाल मातीची रग माझ्याही अंगात आहे.
त्यांनी काही मराठी गीते सादर करीत विद्यार्थ्यांना डोलवले. त्याला टाळ्या, शिट्यांचा जोरदार प्रतिसाद मिळाला.
प्राचार्य डॉ. राजेंद्र लोखंडे, प्राचार्य डॉ. आर. आर. कुंभार, संचालक डॉ. एस. पी. रथ, प्राचार्य डॉ. एस. व्ही. ढेकळे, डॉ. शरद गायकवाड, लेफ्टनंट उमेश वांगदरे, डॉ. अरिफ महात, डॉ. प्रभा पाटील, डॉ. दीपक भोसले, प्रा. सुप्रिया पाटील, प्रा. समीक्षा फराक्टे, प्रा. श्वेता पाटील, प्रा. ज्योती हिरेमठ, प्रा. अमर मेस्त्री, प्रा. निकिता जरग, प्रा. तेजस्विनी चिले, प्रा. श्‍यामल पवार, प्रा. सायली चव्हाण, प्रा. संदीप पाटील उपस्थित होते. ‘यिन’ मुख्यमंत्री पार्थ देसाई, रोहन शारबिद्रे, सौरभ चौगले, ओंकार साठे, ओंकार चव्हाण, ज्योती कपले, ऋषीकेश कारंजे, अजिंक्य शिंदे, पृथ्वीराज घोडके, आदिती कोरे, प्रथमेश कोळी, प्रणाली सावंत, श्रुतिका लाळे, प्रशांत गवसेकर, सुयश पाटील, विशाखा देवलकर, श्रेया चौगुले, राजलक्ष्मी कदम, शिवानी शिंदे, निखिल जाधव, चित्रेशा नांगरे, हरीश सांधुगडे, हर्षद पवार, अनिकेत सूर्यवंशी, रोहित कांबळे यांनी परिश्रम घेतले. ‘यिन’चे सहायक व्यवस्थापक अवधूत गायकवाड यांनी संयोजन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10396 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..