विजयाराजे सिंधिया यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विजयाराजे सिंधिया यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रम
विजयाराजे सिंधिया यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रम

विजयाराजे सिंधिया यांच्या तैलचित्राच्या अनावरण कार्यक्रम

sakal_logo
By

४७५२३

संस्कार जोपासण्यात मातृ शक्तीचे योगदान
केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे; विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राचे कृषी महाविद्यालयात अनावरण
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ३ : आधुनिक भारताची क्षमता नक्षत्रासारखी असून भारतीय संस्कार व मूल्य जोपासण्यात मातृशक्तीचे योगदान मोठे आहे, असे प्रतिपादन केंद्रीय नागरी व वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी आज येथे केले. राजमाता विजयाराजे शिंदे यांचा जीवन प्रवास ‘जनसेवा’ शब्दांत सामावला असून त्यांनी राजकारणाला समाजसेवेचे माध्यम केल्याचे त्यांनी सांगितले. राजर्षी छत्रपती शाहू महाराज कृषी महाविद्यालय व भास्कराचार्य प्रतिष्ठानतर्फे राजमाता विजयाराजे शिंदे यांच्या तैलचित्राच्या अनावरणप्रसंगी ते बोलत होते. भारतीय मूल्ये, नारी शक्तीचे कर्तृत्व, छत्रपती शिवराय व राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचा तेजस्वी इतिहास ते विजयाराजे शिंदे यांचा जीवनपट याविषयी त्यांनी उपस्थितांशी संवाद साधला. राजमाता विजयाराजे शिंदे विद्यार्थिनी वसतिगृह येथे कार्यक्रम झाला.
श्री. शिंदे म्हणाले, ‘‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारत विश्वातील पाचवे आर्थिक शक्तिशाली राष्ट्र बनले आहे. ही असीम शक्ती असून जगातील शक्तिशाली देशांच्या शृंखलेत भारताने स्थान मिळवले आहे. हे आत्मनिर्भरतेचे उत्तम उदाहरण आहे. छत्रपती शिवरायांनी मराठा साम्राज्याचा विस्तार करताना पोर्तुगीज, इंग्रज, सिद्दी, मुगल यांना गाडले. हा इतिहास महाराष्ट्र व देशाचा आहे. तसा तो तुमचाही आहे. पंतप्रधानांनी शिवरायांची अष्टकोनी राजमुद्रा नौदलाचे चिन्ह केले आहे. त्यामागची त्यांची प्रेरणा शिवराय आहेत.’’
ते म्हणाले, ‘‘राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची समाजसेवेची विचारधारा होती. त्यांनी समतेचा झेंडा फडकवून क्रांतीची सुरुवात कोल्हापुरातून केली. शाहू महाराज व सयाजीराव गायकवाड यांचे समाज परिवर्तनात महत्त्वपूर्ण योगदान आहे. स्वराज्य जननी जिजाऊ, अहिल्याबाई होळकर, गंगाबाई शिंदे, राणी लक्ष्मीबाई, मदर तेरेसा यांचा इतिहास प्रेरणादायी आहे. त्या श्रेणीत माझ्या आजी विजयाराजे यांचे नाव जोडले जाते. त्यांनी आयुष्यभर जनसेवेला महत्त्व देत कार्य केले.’’
शिवरायांनी हिंदवी स्वराज्याचा विचार करताना मराठा साम्राज्य वाढवले. महादजी शिंदे यांनी अटकेपार झेंडा फडकवला. विजयाराजे स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाल्या होत्या. मुंबईत नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या भाषणातील शब्दांचा त्यांच्यावर प्रभाव पडला. त्यांच्या हृदयात ज्वालामुखी तयार झाला आणि उर्वरित आयुष्य त्यांनी जनसेवेसाठी वाहिले. माझ्या वडिलांनीही मला जनसेवेची शिकवण दिली, असेही त्यांनी स्पष्ट केले.
उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘विजयाराजे उत्तुंग व्यक्तिमत्त्व होत्या. त्या दहावीनंतर वाराणसीतील वसतिगृहात राहिल्या. त्या दोनदा खासदार होत्या. दुष्काळात त्या लोकांसाठी धावून गेल्या.’’
प्र-कुलगुरू डॉ. पी. जी. पाटील यांनी महाविद्यालयाच्या कुंपणासाठी आर्थिक निधीची मागणी केली. चित्रकार सुनील जोशी यांचा सत्कार केला.
खासदार धनंजय महाडिक, खासदार प्रा. संजय मंडलिक, आमदार ऋतुराज पाटील, भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, डॉ. भारत खराटे, डॉ. शरद गडाख, प्रमोद लहाळे, राजेंद्र सूर्यवंशी उपस्थित होते. डॉ. प्रमोद रसाळ यांनी आभार मानले.


ध्येय ठरवा, वाटचाल करा
आज मी खासदार किंवा नामदार नाही. मराठा म्हणून उभा आहे. मी हृदयापासून काम करतो. आजचा क्षण माझ्यासाठी भावनिक आहे. कारण माझ्या आजी विजयाराजे यांचे कौटुंबिक, सामाजिक, राजकीय जीवन प्रेरक होते, असा उल्लेख श्री. शिंदे यांनी केला. भाषणानंतर त्यांनी व्यासपीठासमोरील विद्यार्थिनींशी संवाद साधला. ध्येय ठरवून वाटचाल करण्याचे आवाहन केले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10401 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..