विद्यापीठ परीक्षा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ परीक्षा
विद्यापीठ परीक्षा

विद्यापीठ परीक्षा

sakal_logo
By

१३७१

अमेरिकेत रंगणार
कोल्हापूरचा ‘स्वरनिनाद’
फुलेवाडी ः कोल्हापूर येथील कलाकारांचा स्वरनिनाद कार्यक्रम अमेरिकेत रंगणार आहे. निर्माता सुनील सुतार व दिग्दर्शक प्रा. सुरेश शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली स्वरनिनादने गेल्या ३२ वर्षांत भारतात ३२०० हून अधिक संगीतमय कार्यक्रम सादर केले आहेत. दोन राष्ट्रीय व दोन राज्य पुरस्कारही त्यांना मिळाले आहेत. २०१५ मध्ये स्वरनिनादने अमेरिकेत २८ कार्यक्रम सादर केले होते. आता पुन्हा या दुसऱ्या दौऱ्यात १५ नोव्हेंबरअखेर जागो हिंदुस्तानीसह हिंदी, मराठी गीतांचा कार्यक्रम अमेरिकेतील प्रमुख शहरात सादर करणार आहेत. दौऱ्यात निर्माते सुनील सुतार, रघुनंदन येतावडेकर, भारतभूषण शेंबेकर, रणजीत बुगले, विजय वळवडे, सीमा सोनार, गणेश साळोखे, स्वानंद जाधव यांचा समावेश आहे. महेंद्र शहा यांनी या दौऱ्याचे आयोजन केले आहे.

फक्त फोटो
02003


सडोलीत मंगळवारी विज्ञान प्रदर्शन
फुलेवाडी ः करवीर पंचायत समिती शिक्षण विभागातर्फे करवीर तालुका विज्ञान प्रदर्शन मंगळवारी (ता. ६) सडोली येथे आयोजित केल्याची माहिती गटशिक्षणाधिकारी समरजित पाटील यांनी दिली. प्रदर्शनाचे मुख्य विषय तंत्रज्ञानाने खेळणी हा आहे. पर्यावरणास अनुकूल सामग्री, आरोग्य आणि स्वच्छता, सॉफ्टवेअर आणि ॲप्स, वाहतूक परिवहन, पर्यावरण आणि हवामान बदल, गणितीय मॉडेलिंग आदी उपविषय आहेत. पाच गटांत प्रदर्शन होणार आहे. नवनिर्मिती असलेले उपकरण प्रदर्शनात मांडण्यात यावे. उपकरणाबरोबर एक शिक्षक व एक विद्यार्थी उपस्थित राहणार असून उपकरणांचे मूल्यमापन कोड पद्धतीने होणार असल्याचे गटशिक्षणाधिकारी पाटील यांनी सांगितले. ज्येष्ठ शिक्षण विस्तार अधिकारी एस. के. यादव, आनंदराव आकुर्डेकर, विश्वास सुतार, डी. ए. पाटील उपस्थित होते.

बी.ए. एम.बी.ए. परीक्षा सुरळीत
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठाच्या परीक्षा विभागातर्फे बी. ए, एम.बी.ए. अभ्यासक्रमाच्या परीक्षा आज झाली. एकूण ५०२० विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. दरम्यान, दहा परीक्षांचे निकालही जाहीर केले. आजपर्यंत एकूण २३६ परीक्षांचे निकाल जाहीर झाले आहेत. विद्यापीठाने परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी भरारी पथके स्थापन केली आहेत. पथकांकडून परीक्षेत गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांवर गैरप्रकार म्हणून प्रत्यक्ष नोंद करुन परीक्षा प्रमाद समितीतर्फे नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक डॉ. अजितसिंह जाधव यांनी म्हटले आहे.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10403 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..