10192 | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

10192
10192

10192

sakal_logo
By

लोगो- तू सुखकर्ता...
-------
10192
-
मनात उमटलेली मूर्ती देते आत्मविश्वासाचं बळ
-
मोरेवाडीतील दिव्यांग सम्राट राणेची भावना

संदीप खांडेकर ः सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ५ : ‘‘गणपती बाप्पा म्हणजे बुद्धीची देवता. गणेशोत्सवात त्याची भक्तिभावाने सेवा करण्याची संधी मला मिळते. गणेश आगमनापूर्वी आरास करण्यात मी स्वतःला गुंतवून घेतो. माझी आई मला त्यासाठी मदत करते. मी सजावटीसाठी कोणते साहित्य आणायचे, हे तिला सांगतो आणि आकर्षक पद्धतीने सजावट करतो. भलेही मला मूर्ती दिसते कशी, हे पाहता येत नसले तरी माझ्या मनात उमटलेली मूर्ती मला आत्मविश्वास देणारी आणि प्रतिकूल परिस्थितीशी संघर्ष कसा करावा, हे शिकवणारी आहे’’, मोरेवाडीत राहणारा दिव्यांग सम्राट अशोक राणे सांगत होता. सध्या तो बेळगाव येथे विद्यार्थ्यांना संगणकाचे प्रशिक्षण देत आहे. गणेशोत्सवाकरिता मोरेवाडी येथील निवासस्थानी आला होता. सम्राट दिव्यांग असला तरी त्याला शिक्षणाची लहानपणापासूनच गोडी. आई उषा राणे यांनी त्याच्या शिक्षणात कसूर ठेवली नाही. त्याचे बारावीपर्यंतचे शिक्षण इंग्रजी माध्यमातून झाले. त्याने बंगळूरमधील महर्षी रमण्णा ॲकॅडमीतून पोल्ट्री, डेअरी, सेरीकल्चरचा डिप्लोमा केला. दिल्ली येथे त्याने इन्फर्मेशन टेक्नॉलॉजी परीक्षेत पहिला क्रमांक मिळवला. त्यात त्याने ९६ टक्के गुण मिळविले. त्याने धावणे व ब्रेल लिपी स्पर्धेत अनेक बक्षिसेही पटकावली. त्याला मराठीसह इंग्लिश, कन्नड, तेलुगु, गुजराती भाषा अवगत आहेत.
विशेष म्हणजे तो बुद्धिदेवता गणेशाचा भक्त आहे. गणेशोत्सवात त्याच्या सजावटीसाठी तो खूप मेहनत घेतो. यंदा त्याने साध्या पद्धतीची सजावट केली. त्यासाठी तो थेट बेळगावहून आला होता. गणेशासाठी पाच दिवस वैविध्यपूर्ण रूपात त्यांनी पूजा बांधली होती. विविध फुलांनी मूर्ती सजवून पूजन केले. पाच दिवस गणेशाची आराधना करणाऱ्या गीतांचे सूर त्याच्या घरात घुमत होते. पर्यावरणपूरक पद्धतीने मूर्तीचे विसर्जन झाले पाहिजे, या मताचा तो आहे.

कोट
10191
बुद्धीची देवता खूप काही शिकवणारी आहे. काळानुरूप तुम्ही तुमच्यात बदल केले पाहिजेत. मी दिव्यांग असलो तरी आयफोन वापरतो. कारण मी बुद्धीचा वापर कसा व कोठे करावा, हे शिकलो आहे. त्याला कारणही गणेशच आहे. त्याची मूर्ती मला सदैव ऊर्जा देते.
- सम्राट राणे

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10418 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..