टुडे २ मेन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

टुडे २ मेन
टुडे २ मेन

टुडे २ मेन

sakal_logo
By

विविध खेळांचा लोगो वापरावा...

पदकप्राप्त खेळाडूंना भरघोस बक्षिसे
खेलो इंडियात सुवर्णपदक विजेत्याला पाच लाख

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. ६ : खेलो इंडियात पदक मिळविलेल्या खेळाडूंना भरघोस बक्षीस देण्याचा नूतन क्रीडामंत्री गिरीश महाजन यांनी निर्णय घेतला आहे. क्रीडा संचालनालयाने त्यानुसार सुवर्ण विजेत्यास पाच, रौप्य तीन व कास्यपदक विजेत्यास एक लाख रुपये देण्याबाबतचा प्रस्ताव तयार केला आहे. विशेष म्हणजे सहभागी खेळाडूंना ५० हजार रुपये दिले जाणार आहेत.
खेलो इंडिया स्पर्धेतील पदक विजेत्यांना शासनाने रोख रकमेचे बक्षीस देण्याचा निर्णय घेऊन खेळाडूंना आर्थिक आधार दिला. परिणामी खेळाडूंनी त्यांची स्पर्धेतील कामगिरी सुमार होणार नाही, याकडे कटाक्षाने लक्ष दिले. हरियाना व महाराष्ट्र यांच्यात सर्व साधारण विजेते पदासाठी चढाओढ असल्याने खेळाडू ईर्ष्येने सराव करतात. यंदाही हरियानातील पंचकुला येथे झालेल्या स्पर्धेत त्याची झलक पाहायला मिळाली.
शासन याआधी सुवर्णपदक विजेत्या खेळाडूला १ लाख, रौप्य विजेत्यास ७५ हजार व कास्यपदक विजेत्यास ५० हजार रुपये देत होते. त्यात बदल करत सुवर्ण तीन, रौप्य दोन व कांस्य विजेत्यास एक लाख रुपये देण्याचे निश्चित झाले. राज्यातील सरकार बदलून एकनाथ शिंदे मुख्यमंत्री पदावर विराजमान झाले. क्रीडामंत्री म्हणून गिरीश महाजन यांनी सूत्रे स्वीकारली. लगोलग त्यांनी बक्षिसांत वाढ करण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार प्रस्ताव तयार करून तो मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. त्याला मान्यता मिळाल्यानंतर खेळाडूंना बक्षिसाची रक्कम मिळेल. त्याचबरोबर
केंद्र शासनाकडून सुवर्णपदक विजेत्यास ५ लाख, रौप्य ३ लाख पगार व कास्यपदक विजेत्यास २ लाख रुपये मिळणार आहेत.
........
चौकट
महाराष्ट्राला मिळालेली पदके अशी :
सुवर्ण- ४६
रौप्य- ४०
कास्य- ४०

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10421 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..