दालनात वादावादी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

दालनात वादावादी
दालनात वादावादी

दालनात वादावादी

sakal_logo
By

कोल्हापूर, ता. १३ : ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्‍यांसह कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या ग्रामपंचायत सदस्‍यांवर कारवाई ‍याच्‍या मागणीसाठी जिल्‍हा परिषदेत आलेल्‍या कबनूर ग्रामपंचायतीचे पदाधिकारी व कर्मचाऱ्यांत अधिकाऱ्यांच्या दालनातच वादावादी झाली. शिवीगाळ करणारे ग्रामपंचायत सदस्‍य सैफ मुजावर यांच्‍यावर कारवाई न झाल्‍यास बुधवारपासून (ता. १४) काम बंद आंदोलन करण्‍याचा इशारा श्रमिक जनरल कामगार संघटनेचे आप्‍पा पाटील यांनी दिला आहे.
ग्रामपंचायतीच्‍या कर्मचार्‍यांचे थकीत वेतन मिळावे तसेच कर्मचार्‍यांना शिविगाळ करणार्‍यांवर कारवाई करावी, असे निवेदन ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्‍य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव यांना दिले. यावेळी कबनूरच्‍या सरपंच शोभा पोवार, उपसरपंच सुधीर पाटीलही उपस्‍थित होते. शिवीगाळ करणार्‍यांवर कारवाई करण्‍याचा आग्रह धरत असताना उपसरपंच पाटील यांनी शिवीगाळ झाली नसल्‍याचे मत मांडले. यावर कर्मचारी आणि त्‍यांच्‍यात वादावादी झाली. यावेळी शिविगाळ करणार्‍यांवर कारवाई होत नाही तोपर्यंत काम बंद ठेवण्‍याचा इशारा दिला. यावर उपसरपंच पाटील यांनी काम बंद ठेवण्‍यापुर्वी साहित्‍य ग्रामपंचायतीत जमा करा, असे सांगितले. तेंव्‍हा पाटील यांनी तीच हत्‍यार डोक्‍यात पण घालण्‍यात येतील, असे म्‍हटल्‍यावर उपसरपंच व पाटील यांच्‍यात वादावादी झाली. ग्रामविकास अधिकारी जी. डी. आदलिंग यांनी मध्‍यस्‍थी करत दोघांनाही शांत केले. कर्मचार्‍यांचा थकीत पगार दोन दिवसांत केला जाईल, असे आश्‍वासन दिले. शिष्‍टमंडळात आप्‍पा पाटील यांच्‍यासह सुकुमार कांबळे, औदुंबर साठे, नागेश कांबळे यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10452 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..