कपिल तीर्थ मार्केटमध्ये केबिन धारकांना विरोधक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

कपिल तीर्थ मार्केटमध्ये केबिन धारकांना विरोधक
कपिल तीर्थ मार्केटमध्ये केबिन धारकांना विरोधक

कपिल तीर्थ मार्केटमध्ये केबिन धारकांना विरोधक

sakal_logo
By

पार्किंगमध्ये केबिनवरून
कपिलतीर्थ मंडईत वाद
---
स्थानिक व्यापाऱ्यांचा केबिनधारकांना विरोध
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १७ : कपिलतीर्थ मंडईच्या पार्किंगमध्ये केबिन लावण्यावरून आज वाद निर्माण झाला. स्थानिक व्यापारी, केबिनधारक आणि महापालिका अधिकारी यांच्यात यावरून विसंवाद पाहायला मिळाला.
याबाबत स्थानिकांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही वर्षांपूर्वी महाद्वार रोडवरील फेरीवाल्यांचे सरस्वती चित्रपटगृहाच्या बाजूला पुनर्वसन करण्यात आले होते. त्यांना येथे केबिन टाकून दिल्या होत्या. गेल्या वर्षी या ठिकाणी बहुमजली पार्किंगचे काम सुरू झाले. त्यामुळे या केबिन कपिलतीर्थ मार्केटच्या पार्किंगमध्ये हलविण्यात आल्या. गणेशोत्सवात या जागेत एका सार्वजनिक मंडळाचा देखावा लावण्यात आला होता. त्यामुळे तात्पुरत्या स्वरूपात केबिन हलविण्यात आल्या होत्या. आज या केबिनधारकांनी येथे केबिन लावण्याचा प्रयत्न केला. पार्किंगमध्ये केबिन लावल्यास वाहन पार्क करायला जागा राहत नाही. त्याचा परिणाम येथील व्यापारावर होतो, असा आरोप करून स्थानिक व्यापाऱ्यांनी केबिनधारकांना येथे व्यवसाय करण्यास विरोध केला. या वादात महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनीही भाग घेतला. त्यामुळे काही काळ या परिसरात तणाव निर्माण झाला. नंतर दोन्ही पक्षांनी सामोपचाराची भूमिका घेतल्याने वाद तात्पुरता मिटला.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10471 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..