प्रतीक्षा" च्या स्वप्नांना हवे आर्थिक पंखांचे बळ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

प्रतीक्षा" च्या स्वप्नांना हवे  आर्थिक पंखांचे बळ
प्रतीक्षा" च्या स्वप्नांना हवे आर्थिक पंखांचे बळ

प्रतीक्षा" च्या स्वप्नांना हवे आर्थिक पंखांचे बळ

sakal_logo
By

‘प्रतीक्षा’च्या स्वप्नांना
हवे आर्थिक मदतीचे बळ

प्रतिकुलतेतही नीट परीक्षेत ६५५ गुण

प्रकाश नलवडे ः सकाळ वृत्तसेवा
सांगवडेवाडी ता. १८ : तिच्या वयाच्या चौथ्या वर्षी वडिलांचे निधन झाले. आईने आणि मामाने जिद्दीने तिला शिक्षणासाठी प्रोत्साहित केले. तिने आज नीट परीक्षेत ७२० पैकी ६५५ गुण मिळविले आहेत; पण आता तिच्या डॉक्टर होण्याच्या स्वप्नांच्या भरारीला आर्थिक मदतीच्या पंखांची गरज आहे.
प्रतीक्षा प्रकाश देसाई (सध्या. रा. बारवाड ता. चिकोडी) असे या मुलीचे नाव. वडिलांच्या निधनानंतर तिला सांगवडेवाडी (ता. करवीर) येथील मामा महेश खोचगे यांचा भक्कम पाठिंबा मिळाला. खासगी नोकरी आणि शेती यातूनच उत्पन्न मिळवत संसाराचा गाडा हाकणाऱ्या मामाने मोठ्या मनाने भाचीची जबाबदारी स्वीकारली. त्यामुळेच आज त्यांच्या घरी सत्कारासाठी रिघ लागली आहे. अनेकांनी शब्दरूपी शुभेच्छा दिल्या. तिला डॉक्टर होण्यासाठी कमीत कमी ३० ते ३५ लाख रुपये खर्च अपेक्षित आहे. ‘एम्स’मध्ये प्रवेश घेण्यासाठी त्यांचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र, हे प्रयत्न आर्थिक मदतीमुळे अपुरे पडू नयेत, ही चिंता त्यांना आहे. प्रतीक्षाला आणखीन एक बहीण आहे. तिच्याही भविष्याची चिंता कुटुंबीयांना आहे. नीटची तयारी करताना २४ तासांत केवळ पाच तासांची झोप घेणारी प्रतीक्षा डॉक्टर होण्याचे स्वप्न पाहत आहे. वडिलांची थाप पाठीवर पडली नसली तरीही त्यांचे आशीर्वाद पाठीशी आहेत. आई आणि मामा यांच्यासह देसाई कुटुंबीय ग्रामस्थांचा पाठिंबा मिळत आहे. थोडाफार आर्थिक हातभार मिळाला तर डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते, असा विश्‍वास मामा महेश खोजगे यांना आहे. तिने पुढे यश संपादन करून शासकीय यंत्रणेतून देशाची सेवा करावी, अशी प्रतिक्रिया आई विद्या देसाई यांनी व्यक्त केली.

कोट
वडील कसे होते, काय होते, त्यांचे प्रेम कसे असते हे कळण्याच्या आतच त्यांचे छत्र हरवले. आईनेच दोघांचे प्रेम दिले. २४ तासांतील १८-१९ तास अभ्यास केला. आता अभ्यास आणि पुढे आर्थिक नियोजन यावरच स्वप्न साकार होणार आहे.
- प्रतीक्षा देसाई

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10473 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..