इनरव्हिल क्लब कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इनरव्हिल क्लब कार्यक्रम
इनरव्हिल क्लब कार्यक्रम

इनरव्हिल क्लब कार्यक्रम

sakal_logo
By

50901


स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा :
मुळे; ‘इनरव्हील क्लब सनराईज’तर्फे प्रेरणादायी शिक्षक पुरस्कार

कोल्हापूर, ता. १८ : दुसरे कोणी आपली परीक्षा घेण्यापेक्षा स्वतःचे मूल्यमापन स्वतःच करा, असे आवाहन माजी सनदी अधिकारी ज्ञानेश्वर मुळे यांनी आज येथे केले.
इनरव्हील क्लब ऑफ कोल्हापूर सनराईजतर्फे प्रेरणादायी शिक्षक पुरस्काराच्या वितरणप्रसंगी ते बोलत होते. महावीर उद्यान परिसरातील रोटरीच्या सभागृहात कार्यक्रम झाला.
मुळे म्हणाले, ‘‘शिक्षक ज्ञान द्यायला तयार असतो. विद्यार्थी घेतो किती, हे पाहणे महत्त्वाचे आहे. जुने शिक्षक वेगळ्या विचारधारेचे होते. माझ्या आयुष्याच्या प्रवासात शिक्षकांची भूमिका महत्त्वपूर्ण ठरली. आमची पिढी शाळेला जाणारी पहिली होती. त्या काळी पायात चप्पल घालण्याची प्रथा नव्हती. परिस्थिती बेताची होती, असेही काही नव्हते. त्या काळात शिक्षक विद्यार्थ्यांच्या आवाजावरून विद्यार्थ्याचे नाव सांगायचे. एक शिक्षक तर विद्यार्थ्याचे पाय पाहून त्याचे नाव सांगायचे. शिक्षकांविषयी मनाच्या तळघरातील आठवणी विलक्षण आहेत. त्यांचा विद्यार्थ्यांशी संवाद होता. तसेच विद्यार्थ्यांचे शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतरही ऋणानुबंध कायम असायचा. हे चित्र आजही पाहायला मिळते.’’
सचिन देसाई, संभाजी चौगले, विनोदकुमार भोंग,
रोहिणी शिंदे, जैनब शेख, मिलिंद यादव यांना पुरस्काराने गौरविले. निबंध स्पर्धेतील विजेत्या स्मिता माळी, ऊर्मिला तेली, निर्मला जगताप, सीमा खोत, युवराज पाटील, तर गायन स्पर्धेतील विजेते अमय पोतदार, राजवर्धन तगारे, अमर चोपडे, अमरसिंह संघवी, स्वरा आकोळकर यांना बक्षिसे देण्यात आली.
सनराईजच्या अध्यक्ष सोनाली पटेल, पोलिस उपअधीक्षक स्वाती गायकवाड, साहित्यिक डॉ. श्रीकांत पाटील, प्रा. के. टी. जाधव उपस्थित होते. संयोगीता महाजन व अमृता परेख यांनी सूत्रसंचालन केले. मंजिरी देवाणावर यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10474 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..