पान २ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान २
पान २

पान २

sakal_logo
By

सारथीच्या विभागीय केंद्रांवर
कौशल्य कार्यशाळा घ्याव्यात
---
मराठा संघटनांतर्फे सारथी अध्यक्ष, संचालकाकडे मागणी

कोल्हापूर, ता. १८ : राजर्षी छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्थेच्या (सारथी) विभागीय केंद्रांवर कौशल्य विकासासाठी कार्यशाळा घ्याव्यात, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चा, अखिल भारतीय मराठा महासंघ, शिवप्रहार व छावा संघटनेच्या शिष्टमंडळातर्फे केली. सारथीच्या अध्यक्ष व संचालक मंडळाच्या बैठकीत ही मागणी केली.
यावेळी कला, वाणिज्य पदवीप्राप्त विद्यार्थ्यांना नोकऱ्या मिळण्यात अडचणी येत आहेत. औद्योगिक, कार्पोरेट, सहकार आस्थापनांना क्लिरिकल व्यवस्थापकीय कुशल मनुष्यबळ आवश्यक आहे. या क्षेत्राला आवश्यक असणारे कुशल मनुष्यबळ आणि पारंपरिक शिक्षणातून बाहेर पडलेले विद्यार्थी यांच्यात जी कमतरता कौशल्ये कमी आहेत, ती भरून काढण्यासाठी कोल्हापूर, पुणे, मुंबई, नाशिक, संभाजीनगर, नागपूर, लातूर, अमरावती येथे कार्यशाळा घेण्यात याव्यात, असे शिष्टमंडळाने सांगितले. यावर अध्यक्ष व संचालकांनी याविषयी प्रशासनाला प्रस्ताव तयार करायला सांगितला आहे. स्किल गॅप रिपोर्ट दोन तीन दिवसांत सादर करणार आहोत. यामुळे बेरोजगार तरुणांना नोकरीसाठी साह्य होईल, असे स्पष्ट केले.
शिष्टमंडळात राजेंद्र कोंढरे, रघुनाथ चित्रे-पाटील, संजीव भोर, अमर पवार, माउली पवार, वसंतराव मुळीक, अंकुश कदम, प्रमोद जाधव, करण गायकर, धनंजय जाधव, गणेश सोनवणे, विश्वंभर भोपळे, नितीन पवित्रकार, गुलाब गायकवाड, गणेश मापारी, किशोर मोरे, हनुमंत मोटे, विनोद साबळे, अरविंद देशमुख, नरेंद्र मोहिते, दीपाली पाडळे, गोपाळराव चव्हाण, वेंकट शिंदे, अमित सवडे, सुहास सावंत, किशोर गिराम, प्रवीण पवार, सूरज बर्गे यांचा समावेश होता.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10476 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..