पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

51264

मराठी भाषा समृद्ध करणारे ‘नोबेल शलाका’

डॉ. दाभोळकर; डॉ. तेजस्विनी देसाई यांच्या पुस्तकाचे प्रकाशन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १९ : जटिल विज्ञान साध्या, सरळ व रंजक भाषेत सांगण्याचा लेखिका डॉ. तेजस्विनी देसाई यांचा प्रयत्न कौतुकास्पद आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आज येथे केले. समृद्ध मराठी भाषा अधिक समृद्ध करणारे ‘विज्ञानातील नोबेल शलाका’ हे पुस्तक आहे, असेही त्यांनी सांगितले.
डॉ. तेजस्विनी देसाई लिखित ‘विज्ञानातील नोबेल शलाका’ पुस्तक प्रकाशनप्रसंगी ते बोलत होते. त्यांच्याच हस्ते पुस्तकाचे प्रकाशन झाले. प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील व आमदार प्रकाश आबिटकर प्रमुख उपस्थित होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनमध्ये कार्यक्रम झाला.
डॉ. दाभोळकर म्हणाले, ‘पारिवारिक, सांस्कृतिक, साहित्यिक प्रेरणादायी असा आजचा सोहळा आहे. या पुस्तक प्रकाशनाने राजर्षी छत्रपती शाहू महाराज आज हयात असते, तर त्यांना आनंद झाला असता. या पुस्तकाची लेखिका एक मुलगी असून, दुसरी प्रकाशक आहे. ज्यांच्याकडे पैसा व वेळ आहे, असे लोकही पुस्तके लिहितात. मात्र, ती कधी प्रकाशित होतात आणि कधी विस्मरणात जातात, हे कळत नाही. हे पुस्तक नाममुद्रा घेऊन आले आहे. ते विज्ञान रंजक भाषेत सांगते.’
ते म्हणाले, ‘ज्ञानेश्वरांनी मराठी भाषेचा गौरव केला. फादर स्टिफन्स यांनाही या भाषेचा गोडवा लागला. रामदासांनी प्रमाण भाषेत, तर तुकारामांनी लोकभाषेत काव्यरचना केली. मुक्ताबाईंनी प्रमाण व लोकभाषेचा समन्वय साधला. मराठी भाषेला अभिजाततेचा दर्जा मिळविण्यासाठी आंदोलन करण्याची गरज नाही. कारण भाषेचे सामर्थ्य ग्रंथांवर ठरते.’ त्यांनी विवेकानंद, मेरी क्युरी यांची उदाहरणे देत विज्ञान विषयाची माहिती दिली.
डॉ. पाटील म्हणाले, ‘डॉ. देसाई यांची ज्ञान प्रतिभा विलक्षण आहे. संशोधनात महिलांचा टक्का कमी आहे. त्यांनी संशोधनात स्वतःला झोकून देत काम केले आहे. त्यांच्यासारखी जिज्ञासूवृत्ती आजच्या पिढीने अंगीकारायला हवी.’
निर्मलादेवी चव्हाण, अस्मिता कुलकर्णी उपस्थित होत्या. प्राची कुलकर्णी यांनी सूत्रसंचालन केले. रवी देसाई यांनी आभार मानले.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10480 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..