महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पत्रकार परिषद
महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पत्रकार परिषद

महाराष्ट्र युवा प्रतिष्ठान पत्रकार परिषद

sakal_logo
By

‘छत्रपती ताराबाई यांचे
स्मारक कोल्हापुरात व्हावे’

कोल्हापूर, ता. २२ : रणरागिणी छत्रपती ताराबाई यांचे स्मारक व ऐतिहासिक दालन कोल्हापुरात व्हावे, अशी मागणी महाराष्ट्र युवा प्रतिष्ठानच्या अध्यक्ष स्वाती काळे यांनी आज येथे पत्रकार परिषदेत केली. प्रतिष्ठानसह रणमर्दानी महिला मंच, निर्भया महिला मंच व ताराराणी ब्रिगेड या मागणीसाठी आग्रही असून, त्यावर ठोस कार्यवाही व्हावी, अशी त्यांची अपेक्षा आहे.
काळे म्हणाल्या, ‘‘ताराबाई यांचा इतिहास जाज्वल्य व प्रेरणादायी आहे. तो आजच्या पिढीला माहीत होणे आवश्यक आहे. त्या करवीर संस्थानच्या संस्थापिका असून, १७१० ला त्यांनी पन्हाळगडाला राजधानी केले. औरंगजेबाविरुद्ध लढलेल्या ताराबाईंचा इतिहास स्मारकाच्या माध्यमातून जिवंत ठेवणे काळाची गरज आहे. त्यासाठी जिल्ह्यातील दहा आमदार व तीन खासदारांना काही दिवसांपूर्वी निवेदन दिले आहे. त्यावर ठोस कार्यवाही न झाल्यास पुढे काय करायचे यावर विचार केला जाईल.’’
त्या म्हणाल्या, "लोकप्रतिनिधींनी हा विषय शासन स्तरावर प्राधान्याने मांडावा. स्मारक व दालनासाठी शहरातील जागा निश्चित करावी. तसेच त्याचा आराखडाही तयार करावा."
यावेळी शाहीन धारवाडकर, डॉ. रेखा जांभळे, स्वाती काळे, उलफत मुल्ला, अश्विनी हुल्ले, समीर काळे उपस्थित होते.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10490 Txt Kopcity Today

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..