पुस्तक प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तक प्रकाशन
पुस्तक प्रकाशन

पुस्तक प्रकाशन

sakal_logo
By

५२१५२

मोदींच्या कल्पकतेने देशाची प्रतिमा उंचावली
प्रवक्ते माधव भंडारी; ‘व्यवस्था परिवर्तनाची २० वर्षे - मोदी @२० ड्रीम्स मीट डिलीव्हरी,’चे प्रकाशन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २३ : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कल्पकतेने देशाची जगातील प्रतिमा उंचावली आहे, असे प्रतिपादन भारतीय जनता पक्षाचे प्रवक्ते माधव भंडारी यांनी आज येथे केले. भारतीय जनता पक्षातर्फे श्री. भंडारी लिखित ‘व्यवस्था परिवर्तनाची २० वर्षे - मोदी @२० ड्रीम्स मीट डिलीव्हरी,’ पुस्तकाचे आज येथे प्रकाशन झाले. त्या प्रसंगी ते बोलत होते. संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यगृहात कार्यक्रम झाला.
श्री. भंडारी म्हणाले, ‘‘सत्ताबदलापेक्षा व्यवस्थेतील बदल भाजपला अपेक्षित आहे. सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून विविध निर्णय घेतले जात आहेत. एकेकाळी पंतप्रधान व मुख्यमंत्री बदलले तरी सरकार आम्हीच चालवणार, अशी व्यवस्था होती. मोदींच्या नेतृत्वाखाली आता तसे म्हणण्याची हिंमत कोणात राहिली नाही. स्वातंत्र्य मिळून पंचाहत्तर वर्षे झाली तरी एखादी लस विकसित करता आली नव्हती. कोरोना काळात देशाने तब्बल चार लस विकसित केल्या. दोनशे कोटी जनतेला डोस दिले असून, १०१ देशांना लस पुरवली आहे. तसेच ऐंशी कोटी लोकांना रोज धान्याचा पुरवठा केला.’’
उच्च व तंत्र शिक्षण चंद्रकांत पाटील म्हणाले, ‘‘अर्थव्यवस्थेत भारताने इंग्लंडला मागे टाकले आहे. इस्त्रायलला जाण्याचे धाडस यापूर्वी कोणत्याही पंतप्रधानांनी केले नाही. ते धाडस मोंदीनी केले. भाजपचे २०२४ ला ४०० जागा जिंकण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी मोदी करत असलेल्या कामांबद्दल लोकांच्या मनात अनुकूलता निर्माण करण्याची जबाबदारी कार्यकर्त्यांची आहे.’’
खासदार धनंजय महाडिक म्हणाले, ‘‘मोदींवरील हे पुस्तक नसून तो ग्रंथ आहे. विविध क्षेत्रांतील बावीस लोकांनी मते यात आहेत. मोदी हे प्रतिभाशाली पंतप्रधान असून, हा ग्रंथ विक्रीचा वर्ल्ड रेकॉर्ड करेल.’’
भाजपचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष समरजितसिंह घाटगे यांनी डाव्या विचारांच्या लोकांनी गुजरातमध्ये आदिवासींची दिशाभूल केल्याचा आरोप केला.
माजी आमदार अमल महाडिक, माजी आमदार सुरेश हाळवणकर, सत्यजित कदम, अजित ठाणेकर, विजय सूर्यवंशी, राहुल चिक्‍कोडे, विजय जाधव, राहुल देसाई उपस्थित होते.

जर्मनची मक्तेदारी मोडीत
औषध निर्मितीतील जर्मनीची मक्तेदारी भारताने मोडली आहे. कोरोना काळात भारत पाठीशी ठामपणे उभे राहिल्याचे अमेरिकेचे पंतप्रधान सांगतात. इस्रायलला भेट देणारे मोदी पहिले पंतप्रधान असून, त्यांच्या नेतृत्वाखाली साडेतीन हजार कायद्यांत बदल करण्यात आल्याचे श्री. भंडारी यांनी स्पष्ट केले.

प्रदर्शनाला गर्दी
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवन चरित्रावर नाट्यगृहातील बाबूराव पेंढारकर कलादालन येथे प्रदर्शन भरविण्यात आले आहे. ते पाहण्यासाठी नागरिकांची गर्दी होती.

Web Title: Todays Latest Marathi News Kpc22b10498 Txt Kolhapur

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..