इरिगेशन फेडरेशन पत्रक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

इरिगेशन फेडरेशन पत्रक
इरिगेशन फेडरेशन पत्रक

इरिगेशन फेडरेशन पत्रक

sakal_logo
By

इंधन अधिभार वगळून
योजनांची वीजबिले भरा
---
जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे आवाहन
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. २७ : सर्व पाणीपुरवठा संस्थांनी अन्यायी ६५ पैसे प्रतियुनिट इंधन अधिभार वगळून महिन्याची सवलतीच्या दराने आलेली बिले भरावीत, असे आवाहन कोल्हापूर जिल्हा इरिगेशन फेडरेशनचे अध्यक्ष विक्रांत पाटील-किणीकर यांनी पत्रकाद्वारे केले आहे. इंधन अधिभार विरोधात फेडरेशन रस्त्यावर उतरून लढणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
पत्रकात म्हटले आहे, की शासनाने गेल्या महिन्यात उपसा जलसिंचन संस्थांना जून २०२१ पासून ते मार्च २०२३ पर्यंत सवलतीचे दर जाहीर केले. त्यात लघुदाब पाणीपुरवठा संस्थांना एक रुपया प्रतियुनिट आणि उच्चदाब पाणीपुरवठा संस्थांना एक रुपया १६ पैसे प्रतियुनिट असा दर जाहीर केला. त्याचे इरिगेशन फेडरेशनच्या सर्व शेतकऱ्यांनी स्वागत केले. पण, मध्यंतरी ‘महावितरण’ने शेतीपंप ग्राहकांना ६५ पैसे प्रतियुनिट इंधन अधिभार लावला आहे. त्याबद्दल सर्वच स्तरांतून ‘महावितरण’ला विरोध करण्यात आला.
राज्य सरकारने जाहीर केलेल्या सवलतीच्या पत्रकाप्रमाणे बिलमध्ये चालू महिन्यात वापर झालेल्या युनिटचा दर आहे. पण, मागील थकबाकी कमी झाली नाही. यावर ‘महावितरण’शी फेडरेशनने संपर्क केल्यावर ‘महावितरण’चे अधीक्षक अभियंता अंकुर कावळे यांनी जून २०२१ पासून सवलत जाहीर झाल्याने त्या महिन्यापासून हिशेब करून पुढील बिलात थकबाकी कमी होईल, असे आश्वासन दिले आहे.