पान ५ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ५
पान ५

पान ५

sakal_logo
By

पशुसंवर्धन पर्यवेक्षकांची
एका दिवसात नियुक्ती

कोल्हापूर, ता. २९ : जनावरांना लम्पी रोगाची बाधा होत आहे. हा आजार वाढत चालला असून पशुपालक चिंतेत आहे. त्यामुळे पशुवैद्यकीय सेवा दारोदारी पोहोचवण्यासाठी मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी चोवीस तासांत २२ पशुसंवर्धन पर्यवेक्षक यांची नियुक्ती केली आहे. तसेच, त्यांना तत्काळ कामावर हजर होण्याचे आदेश दिले आहेत. पशुसंवर्धन पर्यवेक्षक यांची ही निवड कंत्राटी तत्त्वावर तीन महिन्यांसाठी केली आहे. निवड झालेल्या उमेदवारांत सिद्धार्थ भिके, गौरव पडवळ, वैभव कांबळे, विश्वजित शेवाळे, कृष्णात हंकारे, सुधीर पोवार, दीपक कोळी, आदेश गावडे, संजय सुतार, उदय पाटील, दीपक कांबळे, आकाश पाटील, विठ्ठल शेंदुरे, राहुल पाटील, दिग्विजय गुरव, साईराज सरनोबत, स्नेहीत पाटील, भगवान कांबळे, इरतेजा नाईक, बसगोंडा अर्जुनवाडे, सुशांत कांबळे, संदीप पाटील यांचा समावेश आहे.