विद्यापीठ बैठक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ बैठक
विद्यापीठ बैठक

विद्यापीठ बैठक

sakal_logo
By

10371

कोल्हापूर : लोकनेते बाळासाहेब देसाई यांच्या प्रतिमेस अभिवादन करताना मंत्री शंभूराज देसाई. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे.

बाळासाहेब देसाई अध्यासन कामास गती देणार
मंत्री शंभूराज देसाई; अडीच कोटींचा निधी देण्यासाठी त्या पूर्तता
कोल्हापूर, ता. १ : शिवाजी विद्यापीठाच्या लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी शासन व व्यक्तिगत स्तरावर सर्वतोपरी प्रयत्न करू, अशी ग्वाही राज्य उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांनी आज येथे दिली. अध्यासनासाठी मंजूर तीन कोटींमधील उर्वरित अडीच कोटींचा निधी तातडीने विद्यापीठास वितरित करण्यासाठी आवश्यक त्या पूर्तता करण्यात येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले.
शिवाजी विद्यापीठात लोकनेते बाळासाहेब देसाई अध्यासनाच्या अनुषंगाने झालेल्या आढावा बैठकीत ते बोलत होते. बैठकीत अध्यासनाच्या कामकाजाची अडचणींची व भविष्यात करता येऊ शकणाऱ्या विविध विधायक कामांची माहिती घेतली.
श्री. देसाई म्हणाले, ‘लोकनेते देसाई यांचे विद्यापीठाच्या उभारणीमधील योगदान अतुलनीय आहे. नव्या पिढीला त्यांच्या लोकनेते कार्याची माहिती होण्याच्या दृष्टीने अध्यासनातर्फे विविध उपक्रमांच्या माध्यमातून प्रयत्न होणे आवश्यक आहे. त्या मदतीसाठी शासन तत्पर असून, शासनाव्यतिरिक्त विविध उद्योग-व्यवसायांच्या सामाजिक दायित्व निधीमधूनही निधी मिळविण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील. जिल्हा नियोजन मंडळाच्या माध्यमातून नावीन्यपूर्ण योजनेंतर्गत निधीची तरतूद करण्याची सूचना त्यांनी जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांना केली. अध्यासनाच्या कामाला गती देण्यासाठी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री दीपक केसरकर यांच्यासमवेतही चर्चा करू, असेही त्यांनी सांगितले.
यावेळी प्र-कुलगुरू डॉ. प्रमोद पाटील यांच्या हस्ते श्री. देसाई यांचा सत्कार करण्यात आला. अध्यासनाचे प्रमुख डॉ. अवनीश पाटील, माजी आमदार डॉ. सुजित मिणचेकर, शिवराज देसाई, जिल्हाधिकारी रेखावार, उच्च व तंत्रशिक्षण उपसंचालक हेमंत कठरे, प्रभारी कुलसचिव डॉ. विलास शिंदे, प्रभारी वित्त व लेखाधिकारी अजित चौगुले, डॉ. एम. एस. देशमुख, डॉ. भारती पाटील, डॉ. अरुण भोसले, व्ही. जी. पानस्कर उपस्थित होते.
........
स्मारकासाठी ७५ लाख राज्य सरकार देणार
जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत श्री. देसाई यांनी लोकनेते बाळासाहेब देसाई स्मारकाची माहिती घेतली. तसेच स्मारकासाठी ७५ लाख रुपयांचा प्रस्ताव तयार करून पाठवावा, अशी सूचना केली.