पान ७ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पान ७
पान ७

पान ७

sakal_logo
By

निष्ठावंत शिवसैनिक आज
मुंबईकडे रवाना होणार
--
लोगोसह टी शर्ट वाटप कार्यक्रम

कोल्हापूर, ता. ३ : ‘मनात हिंदुत्वाची कास आणि उद्धव ठाकरे ना साथ,’ या घोषवाक्यसह हजारो शिवसैनिक उद्धव ठाकरे यांच्या विचाराचे सोने लुटण्यासाठी
उद्या (ता. ४) मुंबईकडे दसऱ्या मेळाव्याला रवाना होणार आहेत. यासाठी आज लोगोसह टी शर्ट वाटप केले. शासकीय विश्रामगृहात कार्यक्रम झाला.
शिवतीर्थावर जमणारा निष्ठावान शिवसैनिकांची स्वतःच्या तन-मन-धनान हरपून हिंदुत्वाचा व उद्धव ठाकरेंचा जयघोष करत बाहेर पडणार आहेत. शिवसैनिकांनी हिंदुत्वाचा जागर असणारे आपल्या स्व-खर्चातून टी-शर्ट परिधान केले व टी शर्टच वाटप जिल्हाप्रमुख संजय पवार यांच्या उपस्थितीत झाले. यावेळी जिल्हाप्रमुख विजय देवणे, शहरप्रमुख रविकिरण इंगवले, सुनील मोदी, हर्षल सुर्वे, धनाजी यादव, विकी मोहिते, दिनेश साळोखे, अतुल साळोखे, स्वरूप मांगले, केदार वाघापूरकर, प्रीतेश दुग्गे, विनय क्षीरसागर, मानतेश पकाले, सरदार तिप्पे, जीवन पाटील, गोविंद वाघमारे, सुरेश पोवार, विकास बुरबुसे, दिनेश परमार, राहुल माळी, विवेक काटकर, अभिजित पोरे, शुभांगी पोवार आदी उपस्थित होते.