स्वराज्य शाखा उद् घाटन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

स्वराज्य शाखा उद् घाटन
स्वराज्य शाखा उद् घाटन

स्वराज्य शाखा उद् घाटन

sakal_logo
By

रायगडमध्ये ‘स्वराज्य’च्या शाखांचे उद्‌घाटन
कोल्हापूर, ता. १३ : स्वराज्य संकल्प अभियानांतर्गत रायगड जिल्ह्यात स्वराज्य संघटनेच्या शाखांचे उद् घाटन झाले. युवराज संभाजीराजे छत्रपती यांचा रायगड जिल्हा दौरा सुरू आहे. जिल्ह्यात संघटनेच्या सुमारे २०० शाखांचे उद् घाटन होणार आहे. याबाबत संभाजीराजे यांनी फेसबुक पेजवर म्हटले आहे की, ‘‘रायगड जिल्ह्यात गावेच्या गावे ''स्वराज्य''च्या शाखा उद् घाटनासाठी उत्साहाने उपस्थित राहत आहेत. माता-भगिनी एखाद्या सणासारखा उत्सव साजरा करत आहेत. ‘घर तिथे स्वराज्य’ हे उद्दिष्ट साध्य होत आहे. शाखा उद् घाटनास मिळणारा उदंड प्रतिसाद ''स्वराज्य''ला संघटनात्मक ताकदीच्या यशोशिखरावर घेऊन जात आहे.’’