जिल्हा परिषदेकडील २४ कोटीची कामे रद्द | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जिल्हा परिषदेकडील
२४ कोटीची कामे रद्द
जिल्हा परिषदेकडील २४ कोटीची कामे रद्द

जिल्हा परिषदेकडील २४ कोटीची कामे रद्द

sakal_logo
By

जिल्हा परिषदेकडील
२४ कोटींची कामे रद्द
शासनाचे आदेश; लोकप्रतिनिधी, कंत्राटदारांना दणका
सकाळ वृत्तसेवा,
कोल्हापूर, ता. १२ : राज्यातील शिंदे - फडणवीस सरकारने बहुतांश महाविकास आघाडीच्या नेत्यांना आज झटका दिला. लोकप्रतिनिधींनी सुचविलेली ग्रामीण भागातील विकासकामे रद्द करण्याचे आदेश काढण्यात आले. त्यामुळे कोल्हापूर जिल्हा परिषदेची २४ कोटींची १५० कामे रद्द झाली. स्थानिक निधी विकास कार्यक्रम अंतर्गत मंजूर झालेली कामे रद्द झाल्याने कंत्राटदार हवालदिल झाले आहेत.
गावांतर्गत मूलभूत सुविधांसाठी स्थानिक निधी विकास या शीर्षकाखाली निधी उपलब्ध होतो. त्या निधीतून गावातील रस्ते, गटरी, मंदिर, स्वच्छतागृहे, परिसर सुशोभीकरण, स्मशान शेड आदी विकासकामे केली जातात. राज्य शासनाने ३० जूनला जिल्ह्यातील सुशिक्षित बेरोजगार अभियंत्यांना काम वाटप करण्यात आले. तसेच, ज्या कामांच्या निविदा प्रक्रिया झालेली नाही याचबरोबर, निविदा प्रक्रिया झाली; पण काम सुरू करण्याचे आदेश नाहीत, अशी सर्व कामे स्थगित करण्याचे आदेश दिले आहेत. मंत्रालय स्तरावर तडजोड करून या कामावरील स्थगिती उठवण्यासाठी कंत्राटदारांचे प्रयत्न सुरू होते; मात्र आज या प्रयत्नांना ब्रेक लावण्यात आला. आज शासनाकडून, जी कामे सुरू झालेली नाहीत किंवा वर्क ऑर्डर दिलेली नाही, अशी कामे रद्द करण्यात आली.
शासनाने अचानक कामे रद्द करण्याचा निर्णय घेतल्याने लोकप्रतिनिधी व कंत्राटदारांना पुढे काय करायचे, असा प्रश्न पडला आहे. कारण रस्ते आणि अडचणीच्या ठिकाणी असलेली मात्र पावसाळ्यात सुरू न होणारी व आता परतीच्या पावसामुळे थांबली होती, ती देखील रद्द झाली आहेत. राजकीय कुरघोडीत ग्रामस्थ आणि सुशिक्षित बेरोजगार अभियंते, कंत्राटदार यांचे मात्र हाल होत आहेत.