विद्यापीठ कार्यक्रम | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ कार्यक्रम
विद्यापीठ कार्यक्रम

विद्यापीठ कार्यक्रम

sakal_logo
By

10481
कोल्हापूर : शिवाजी विद्यापीठात बोलताना पोपटराव पवार. शेजारी प्र-कुलगुरू डॉ. पी. एस. पाटील, डॉ. नितीन माळी.
-------------
गावे स्वावलंबी झाल्यास देश समृद्ध
पोपटराव पवार ; शिवाजी विद्यापीठात व्याख्यान
कोल्हापूर, ता. २० : जाती-पातीपलीकडे जात गावात विविध योजना राबवत कामे केली तर गावात कितीही गट-तट असले तरी ग्रामविकास साधता येतो, असे प्रतिपादन पद्मश्री पोपटराव पवार यांनी येथे केले. देशातील गावे जोपर्यंत स्वावलंबी होत नाहीत, तोपर्यंत देश स्वावलंबी आणि समृद्ध होणार नाहीत, असेही ते म्हणाले.
शिवाजी विद्यापीठाच्या यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागातर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. त्यांनी व्यसनाधीनता, पर्यावरणविषयक, धार्मिक, शास्त्रीय, क्रीडाविषयक, ग्रामविकासाच्या विविध माध्यमांच्या विविध विषयांना स्पर्श केला. प्र-कुलगुरू प्रा. डॉ. पी. एस. पाटील अध्यक्षस्थानी होते.
श्री. पवार म्हणाले, ‘शेतीतील बदलासह वसुंधरा वाचवण्यासाठी जलसंधारणही महत्त्वाचे आहे. तरुणाईत जग बदलण्याची क्षमता असून, तरुणाईला योग्य दिशा दिली गेली तरी ग्रामविकास व विकास शक्य आहे.’ तंत्रज्ञानाचा वापर करत त्यांनी हिवरे बाजार ग्रामविकासाचे चित्र उपस्थितांसमोर उभे केले. उपस्थितांच्या प्रश्नांना उत्तरे दिली.
डॉ. नीलम जाधव यांनी प्रमुख पाहुण्यांचा परिचय दिला. यशवंतराव चव्हाण स्कूल ऑफ रूरल डेव्हलपमेंट विभागाचे प्रभारी संचालक डॉ. नितीन माळी यांनी प्रास्ताविक केले. समाजकार्य विभागाच्या सौरभ धनवडे यांनी सूत्रसंचालन केले. संध्या कांबळे यांनी आभार मानले.