किल्ले बांधणीला जोर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

किल्ले बांधणीला जोर
किल्ले बांधणीला जोर

किल्ले बांधणीला जोर

sakal_logo
By

58047
गड बांधणीतून ऐतिहासिक काळाला उजाळा

कोल्हापूर, ता. २१ : दगड, माती, विटांच्या रचनेतून किल्ले साकारले जात असून, छोटे मावळे, तटबंदीसह रंगरंगोटीच्या साहित्याची खरेदी त्यांच्याकडून केली जात आहे. गड बांधणीतून ऐतिहासिक काळाला उजाळा देत स्थापत्य शास्त्राचे धडे ते गिरवत आहेत.

दिवाळीत किल्ले बांधणी का?
गडकोटांच्या बांधणीतून अभेदता कशी टिकवावी, हे कळते. घरातील धनसमृद्धता टिकवायची असेल तर संरक्षण महत्त्वाचे आहे. त्यासाठी तटबंदी, बुरुज, बालेकिल्ला, नगारखाना, विविध वास्तू यांची रचना समजून घेणे आवश्यक आहे. त्यातूनच किल्ले बांधणीची परंपरा सुरू झाल्याचे अभ्यासक सांगतात. लहान मुलांना किल्ला म्हणजे काय, त्याची रचना कशी असते, हे समजावे यासाठी इतिहास विषयावर कार्य करणाऱ्या संस्थांकडून मुलांना गड भेट घडवून आणत आहेत.

शहरात कोठे पाहाल किल्ले.?
शिवछत्रपतींची प्रेरणा घेऊन दिवाळीला किल्ले बनविण्याची परंपरा जुनी असून, शिवाजी, उत्तरेश्वर, बुधवार, मंगळवार पेठेसह गल्लोगल्ली आजही छोटे-छोटे किल्ले बनवले जातात. येथे किल्ले बनविण्याची जोरदार तयारी सुरू आहे.


स्पर्धेतून प्रोत्साहन...
गडकोटांचे महत्त्व अबाधित राहावे, याकरिता किल्ले बांधणीच्या स्पर्धा घेतल्या जात आहेत.
त्या स्पर्धेत बालचमू उत्स्फूर्तपणे सहभाग घेत आहेत. दरवर्षी स्पर्धांचा आकडा वाढत आहे.
रायगड, राजगड, तोरणा, प्रतापगड, विशाळगड, पन्हाळा, विजयदुर्ग, जंजिरा यासारखे बांधणीच्या अनुषंगाने कठीण असणारे किल्ले बालचमूंकडून तयार केले जात आहेत. विशेष म्हणजे गडकोटांची भ्रमंती करणाऱ्यांकडून त्याचे परीक्षण केले जाते आहे.


कोट
किल्ले तयार करताना लहान मुला-मुलींना त्यातून ऊर्जा मिळते. ही ऊर्जा त्यांना इतिहासाकडे बघण्याचा दृष्टिकोन स्पष्ट करते. विशेषतः पालकांनी वर्गाने मुलांना किल्ला कसा तयार करावा, हे सांगायला हवे. त्यांच्या आनंदात सहभागी होणे गरजेचे आहे.
- प्रवीण हुबाळे (सचिव, सह्याद्री प्रतिष्ठान)