विद्यापीठ निवडणूक अर्ज | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यापीठ निवडणूक अर्ज
विद्यापीठ निवडणूक अर्ज

विद्यापीठ निवडणूक अर्ज

sakal_logo
By

शिवाजी विद्यापीठ लोगो....
.......

विद्यापीठाच्या निवडणुकीसाठी
विविध संघटनांचे अर्ज


सकाळ वृत्तसेवा

कोल्हापूर, ता. २८ : शिवाजी विद्यापीठाच्या विविध अधिकार मंडळांच्या निवडणुकीसाठी विविध संघटनांच्या इच्छुक उमेदवारांनी अर्ज भरले. अर्ज दाखल करण्याचा आजअखेरचा दिवस होता. अर्जांची छाननी ३१ ऑक्टोबरपर्यंत होणार असून, १ नोव्हेंबरला सायंकाळी ५ वाजेपर्यंत उमेदवार अर्ज माघारी घेऊ शकतात.
महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठे कायद्यानुसार अधिसभा, विद्या परिषद व अभ्यास मंडळांसाठी निवडणूक होत आहे. त्यासाठी शिवाजी विद्यापीठ विकास आघाडी, शिवाजी विद्यापीठ शिक्षक संघ (सुटा), शिव-शाहू आघाडीने कंबर कसली आहे.
अधिसभा ३९, विद्या परिषदेच्या ८ आणि प्रत्येक अभ्यास मंडळावर ३ सदस्य याप्रमाणे निवड होणार असल्याने त्याकरिता इच्छुकांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत. अधिसभेवर प्राचार्य गटातून १०, शिक्षक गटातून १०, संस्था संचालकांमधून ६, विद्यापीठ अधिविभागातील शिक्षकांमधून ३ आणि नोंदणीकृत पदवीधरांमधून १० सदस्य निवडले जाणार असल्याने संघटनांनी इच्छुकांची सखोल चर्चेअंती अर्ज दाखल केले आहेत. नव्या चेहऱ्यांना संधी देण्याचाही प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर अनुभवी सदस्यांनाही प्राधान्य दिले आहे. अभ्यास मंडळ व विद्या परिषदेकरिताही उमेदवारांनी अर्ज दाखल केले आहेत. आज अर्ज दाखल करण्याचा अखेरचा दिवस असल्याने विद्यापीठ वर्तुळात उमेदवारांची लगबग सुरू होती. संघटनांचे सदस्यही विद्यापीठात आले होते.
दरम्यान, निवडणुकीसाठी संस्थाचालक ११६, महाविद्यालयीन शिक्षक २९४५, विद्यापीठ शिक्षक १६६, नोंदणीकृत पदवीधर ३६३४३, प्राचार्य ९३ व विभागप्रमुख ९३७ मतदार मतदान करतील.
...........
चौकट
- मतदान - १४ नोव्हेंबर
- मतमोजणी - १६ नोव्हेंबर