‘केआयटी’ला पाच कोटीचा निधी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘केआयटी’ला पाच कोटीचा निधी
‘केआयटी’ला पाच कोटीचा निधी

‘केआयटी’ला पाच कोटीचा निधी

sakal_logo
By

‘केआयटी’ला पाच कोटीचा निधी
सकाळ वृत्तसेवा
कंदलगाव, ता. २९ : विज्ञान व प्राद्योगिकी विभागातर्फे भारत सरकारच्या निधी आय.टी.बी.आय. उपक्रमाअंतर्गत २०२१-२२साठी महाराष्ट्रातून कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या कॉलेज ऑफ इंजिनियरिंगची (केआयटी, स्वायत्त) निवड करण्यात आली आहे. उपक्रमांतर्गत संस्थेला ५ कोटी रुपयांचा निधी मिळाला आहे, अशी माहिती संस्थेचे कार्यकारी संचालक डॉ. व्ही. व्ही. कार्जिन्नी यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली.
डॉ. कार्जिन्नी म्हणाले, ‘‘मे-जून २०२१ मधील जाहीरातीनुसार देशभरातील ६०० संस्थांनी आवेदन प्रक्रियेत सहभाग नोंदवला होता. ज्यात आयआयटी, एन्आयटी, अभिमत विद्यापीठ, संशोधन संस्थांचा समावेश होता. नॅशनल इव्हॅल्यूएशन कमिटीतर्फे सर्व संस्थांचे अहवाल सुक्ष्मरित्या अभ्यासून ८७ संस्थांचे अहवाल अंतिम सादरीकरणासाठी निवडण्यात आले. जानेवारी २०२२ मध्ये देशभरातून ३० संस्थांची निवड उपक्रमासाठी करण्यात आली. यात महाराष्ट्रातून केआयटी स्वायत्त संस्थेची निवड करण्यात आली. केआयटीमध्ये सुरु असलेले प्राध्यांपकांचे संशोधन आणि इन्स्टिटयूट इनोव्हेशन कौन्सिलतर्फे चालणारे स्टार्टअपस् अंतर्गत कार्यक्रम तसेच नॅक, एन्. बी. ए. मानांकने, इंडस्ट्री-इन्स्टिटयूट संपर्क उपक्रम या मुद्दयांमुळे संस्थेची निवड झाली.’’
ते म्हणाले, "केआयटी कॅम्पसमध्ये उपक्रमासाठी दहा हजार स्क्वेअर फूट जागा नियोजित केली असून, कोल्हापूर इन्स्टिटयूट ऑफ टेक्नॉलॉजीचे इनोव्हेशन व रिसर्च फॉऊंडेशन सेक्शन ८ कंपनीची स्थापना करण्यात आली आहे. या कंपनीतर्फे प्रॉडक्ट डेव्हलपमेंट व इनोव्हेशनसाठी यंत्रसामग्री व स्टार्टअप साठी क्युबिकल्सची रचना या जागेमध्ये करण्यात येईल. उपक्रमासाठी संकेतस्थळ निर्मिती, मनुष्यबळाची नेमणूक, यंत्रसामग्रीची निवड या बाबीचीं पूर्तता भारत सरकारच्या नियमाप्रमाणे सुरु आहे." संस्थेचे अध्यक्ष सुनिल कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली व सचिव दिपक चौगुले यांचे उपक्रमासाठी सहकार्य मिळाल्याचेही त्यांनी सांगितले.
पत्रकार परिषदेस संचालक डॉ. मोहन वनरोट्टी, डॉ. एस. एम. पिसे, डॉ. रोहन नलवडे, डॉ. सचिन शिंदे उपस्थित होते.