जल जीवन नोव्हेंबर अखेर मार्गी लावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जल जीवन नोव्हेंबर अखेर मार्गी लावा
जल जीवन नोव्हेंबर अखेर मार्गी लावा

जल जीवन नोव्हेंबर अखेर मार्गी लावा

sakal_logo
By

जलजीवन नोव्हेंबरअखेर मार्गी लावा
मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता.३ : जिल्हा परिषदने सुरू असलेल्या जल जीवन मिशन, तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या कामांचा आढावा आज मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव यांनी घेतला. यावेळी जल जीवन मिशन योजनेची कामे नोव्हेंबरअखेर मार्गी लावा, असे आदेश श्रीवास्तव यांनी दिले. यावेळी पाणीपुरवठा विभागाचे मुख्य सचिव संजय जयस्वाल, राजेश कुमार उपस्थित होते.
जिल्हा परिषदेकडून जल जीवन मिशन योजनेचा आढावा मुख्य कार्यकारी अधिकारी संजयसिंह चव्हाण यांनी दिला. यावेळी जिल्ह्यातील १२०० पाणी योजनेपैकी ११०० गावांचे आराखडे तयार केले आहेत. तसेच ७५० पेक्षा अधिक गावांच्या पाणी योजनांच्या वर्कऑर्डर दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. बैठकीस कार्यकारी अभियंता अशोक धोंगे, प्रकल्प संचालक प्रियदर्शनी मोरे उपस्थित होत्या.