बँक ऑफ इंडियाला ९६० कोटींचा निव्वळ नफा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

बँक ऑफ इंडियाला ९६० कोटींचा निव्वळ नफा
बँक ऑफ इंडियाला ९६० कोटींचा निव्वळ नफा

बँक ऑफ इंडियाला ९६० कोटींचा निव्वळ नफा

sakal_logo
By

बँक ऑफ इंडियाला
९६० कोटी निव्वळ नफा
कोल्हापूर, ता. ४ : बँक ऑफ इंडियाने जाहीर केलेल्या दुसऱ्या तिमाही ताळेबंदमध्ये ९६० कोटी रुपये निव्वळ नफा कमावला. मागील तिमाहीमधील एकूण निव्वळ नफा रु. ५६१ कोटी आहे. चालू आर्थिक वर्षात एकूण रु. १ हजार ५२१ कोटी नफा झाला. मागील वर्षीच्या तिमाहीशी तुलना करता ११ टक्के वाढ झाली. बँकेचा व्यवसाय मिश्र रु. ११ लाख ४१ हजार ३५६ कोटी आहे. त्यापैकी एकूण ठेवी रु.६ लाख ४७ हजार ५४१ कोटी असून, तर कर्ज रु.४ लाख ९३ हजार ८१४ कोटी इतके आहे. थकीत कर्जात ९.६ टक्के घट झाली. बचत तसेच चालू ठेवींचे प्रमाण एकूण ठेवींचे प्रमाण ४ टक्के वाढले. मोबाइल बँकिंग आणि इंटरनेट बँकिंगचा वापर करणाऱ्या ग्राहकांची संख्या १ कोटी ७१ लाख झाली. बँकेच्या व्यवसायात आगामी काळात अजून भर पडेल, अशी माहिती बँक ऑफ इंडियाचे कार्यपाल निर्देशक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अतनु कुमार दास यांनी दिली. पुढील तिमाहीत बँक यापेक्षा चांगली प्रगती करेल, असे मत बँक ऑफ इंडिया कोल्हापूर विभागाचे विभागीय व्यवस्थापक हेमंत खेर यांनी व्यक्त केले.