मनसे वाहतूक निवेदन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मनसे वाहतूक निवेदन
मनसे वाहतूक निवेदन

मनसे वाहतूक निवेदन

sakal_logo
By

60802
कोल्हापूर ः मनसेतर्फे शहर वाहतुक शाखेचे पोलिस निरीक्षक स्नेहा गिरी यांना निवेदन देताना पदाधिकारी.

वाहतूक व्यवस्था सुरळीत
करण्याची मनसेची मागणी
कोल्हापूर, ता. ७ : शहरातील वाहतूक व्यवस्था मोडखळीस आली असून बेशिस्तीमुळे सामान्य नागरिकांना त्रास होत आहे. वाहतुकीसाठी असणाऱ्या रस्त्यावरील बेशिस्त पार्किंग, बेवारस वाहने, अवजड वाहनांची ये-जा यामुळे अपघाताची शक्यता आहे. या बाबत वाहतूक शाखेने तातडीने उपाययोजना करत वाहतूक व्यवस्था सुरळीत करावी, अशा मागणीचे निवेदन मनसेतर्फे प्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाला देण्यात आले. या निवेदनाद्वारे रहदारीच्या मार्गावरील पार्किंग हटवणे, दुभाजक बंदिस्त करणे, गर्दीच्या वेळेत अवजड वाहने पर्यायी मार्गाने मार्गस्त करणे, गाडीतील नियमबाह्य बदल व नियमभंगावर सक्तीची करवाई करणे, बेवारस वाहनावर कारवाई करावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या वेळी मनसे जिल्हा उपाध्यक्ष अमित पाटील, राहुल ढवळे, उत्तम वंदुरे, प्रसाद साळुंखे, अमित साळुंखे, अजिंक्य शिंदे, निलेश आजगावकर उपस्थित होते.