पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा
पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा

पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धा

sakal_logo
By

61752

कोल्हापूर : पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेच्या उद्‌घाटनप्रसंगी अंजली निगवेकर, उमा नामजोशी, अनंत निघोजकर, राजेंद्र पित्रे व मान्यवर. 
...

पुरुषोत्तम करंडक एकांकिका
स्पर्धेचा पडदा उघडला

विविध सामाजिक विषयांचे सादरीकरण

कोल्हापूर, ता. ११ : कोल्हापूर विभागाच्या आंतरमहाविद्यालयीन पुरुषोत्तम करंडक एकांकिका स्पर्धेचा आज पडदा उघडला. पहिल्या दिवशी विविध सामाजिक समस्यांवर भाष्य करत प्रत्येकालाच अंतर्मुख व्हायला लावणारे सादरीकरण झाले. शिवाजी विद्यापीठाच्या वि. स. खांडेकर भाषाभवन येथे ही स्पर्धा सुरू आहे.
शिवाजी विद्यापीठ, महाराष्ट्र कलोपासक संस्था, पुणे व गायन समाज देवल क्लबतर्फे सकाळी साडेआठ वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत स्पर्धेला सुरुवात झाली. यावेळी संगीत व नाट्यशास्त्र विभागप्रमुख अंजली निगवेकर, देवल क्लब नाट्य शाखा प्रमुख उमा नामजोशी, महाराष्ट्र कलोपासक संस्था अध्यक्ष अनंत निघोजकर, राजेंद्र पित्रे , शंकर उणेचा, अजित कुलकर्णी, परीक्षक उदय कुलकर्णी, सुनील माने, अभिजित मकाशीर उपस्थित होते. 
स्पर्धेच्या पहिल्या दिवशी भारती विद्यापीठाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाने ‘युरेका युरेका’ एकांकिकेतून दिव्यांग व्यक्तींची व्यथा मांडली. इस्लामपूरच्या यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाने लॉटरी विक्रेत्याच्या मुलीची कथा सादर केली. कडेगावच्या मातोश्री बयाबाई श्रीपतराव कदम कन्या महाविद्यालाने ‘अबुटभर’मधून धरणग्रस्तांची व्यथा मांडली. सांगलीतील व्ही. पी. इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड रिसर्चने ‘अल्झायमर्स’मधून मानसिक आजाराचा विषय मांडला. तर कलाप्रबोधिनीज इन्स्टिट्यूट ऑफ डिझाईन, कोल्हापूरने ‘मृगजळ’, आर्टस्  अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे यांनी ‘फराळ’, डी. डी. शिंदे सरकार कॉलेजने ‘अजून करा प्रयत्न!’ तर विद्यापीठाच्या डिपार्टमेंट ऑफ टेक्नॉलॉजीने ‘विषाद’ एकांकिकेचे सादरीकरण केले. या स्पर्धेतील विजेते भरत नाट्यमंदिर, पुणे येथील महाअंतिम फेरीमध्ये सहभागी होतील.