अंबाबाई मंदिरातील दान | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंबाबाई मंदिरातील दान
अंबाबाई मंदिरातील दान

अंबाबाई मंदिरातील दान

sakal_logo
By

अंबाबाईच्या दानपेटीत
दोन कोटींहून अधिक दान

मंदिरातील दानपेट्यांची मोजणी पूर्ण

कोल्हापूर, ता. १४ ः करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिरातील दानपेट्यांतील रकमेची सुरू असलेली मोजदाद आज संपली. सोमवारी दिवसभरात चार दानपेट्या उघडण्यात आल्या. त्यातून एकूण ४० लाख ९२ हजार रुपयांची रक्कम समितीकडे जमा झाली. तर चार दिवसात सुरू असलेल्या मोजणीमध्ये एकूण २ कोटी २८ हजार ३१३ रुपयांचे दान भाविकांनी देणगी स्वरूपात अंबाबाई मंदिरातील दानपेटीत अर्पण केले आहे.
ही संपूर्ण मोजणी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे सचिव शिवराज नाईकवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ४० कर्मचाऱ्यांमार्फत करण्यात आली. करवीरनिवासिनी अंबाबाईच्या दर्शनासाठी दोन महिन्यांमध्ये लाखो भाविकांनी हजेरी लावली. नवरात्र उत्सव आणि दिवाळी सुट्टीनिमित्त अगदी परराज्यातील भाविकही कोल्हापुरात येऊन गेले. दर्शन घेतलेल्या भाविकांनी देवीला भरभरून दान दिले. या दानाची मोजणी देवस्थान समितीमार्फत गरुड मंडपात गेल्या आठवड्यापासून सुरू होती. सोमवारी ती पूर्ण करण्यात आली. मंदिर परिसरातील बारा दानपेट्यांमध्ये तब्बल २ कोटी २८ हजार ३१३ रुपयांचे दान अंबाबाईला अर्पण झाले आहे.