न्यू काॅलेज पत्रकार परिषद | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

न्यू काॅलेज पत्रकार परिषद
न्यू काॅलेज पत्रकार परिषद

न्यू काॅलेज पत्रकार परिषद

sakal_logo
By

न्यू कॉलेजमध्ये १८, १९ ला आंतरराष्ट्रीय परिषद

राजर्षी शाहूंच्या योगदानाचा जगभर प्रसार करण्यासाठी आयोजन

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : श्री प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाउस संचलित न्यू कॉलेजचा मानव्यशास्त्र आणि अंतर्गत गुणवत्ता व हमी कक्ष यांच्यातर्फे १८ व १९ नोव्हेंबरला आंतरराष्ट्रीय परिषद होत आहे. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांचे स्मृती शताब्दी वर्ष व न्यू कॉलेजच्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त शाहू राजांच्या योगदानाचा जगभर प्रचार व प्रसार करण्यासाठी परिषदेचे आयोजन केले आहे, अशी माहिती प्राचार्य डॉ. व्ही. एम. पाटील यांनी आज येथे पत्रकार परिषदेत दिली. न्यू कॉलेजमध्ये परिषद होईल.

डॉ. पाटील म्हणाले, ‘राजर्षी शाहू छत्रपती दृष्टिकोन, योगदान आणि समकालीन प्रस्तुतता’ असा परिषदेचा विषय आहे. या विषयांतर्गत एकूण १८ वेगवेगळ्या उपविषयांवर शोधनिबंधाचे सादरीकरण होणार आहे. विविध उपविषयांवर एकूण ७० शोधनिबंध विविध महाविद्यालयातील प्राध्यापक, संशोधक विद्यार्थ्यांकडून प्राप्त झालेले आहेत. त्याचे प्रकाशन ‘नवज्योत’ या रिसर्च जर्नलमध्ये होणार आहे. हे जर्नल आयएसएसएन : २७७७-८०६३ वुईथ इम्पॅक्ट फॅक्टर ७.९५८ असणारे आहे.’

ते पुढे म्हणाले, ‘परिषदेत राजर्षी शाहू महाराजांच्या विविधांगी योगदानावर व्याख्याने देण्यासाठी डॉ. सविता मिश्रा (दार्जिलिंग, पश्चिम बंगाल), डॉ. श्रद्धा कुंभोजकर (इतिहास विभाग प्रमुख, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ), डॉ. उमेश बगाडे (माजी इतिहास विभागप्रमुख, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबाद), प्रा. डॉ. जगन कराडे (शिवाजी विद्यापीठ) उपस्थित राहणार आहेत. सुरेंद्र चव्हाण (बार्टी, पुणे), डॉ. जे. एफ. पाटील, इंद्रजित सावंत, अनुराधा भोसले, गणेश काळे हे राजर्षी शाहू छत्रपतींच्या कार्याची समकालीन प्रस्तुतता मांडणार आहेत. श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते परिषदेचे उद्घाटन होणार असून, जिल्हाधिकारी राहुल रेखावार प्रमुख पाहुणे असतील. परिषदेचे बीजभाषक डॉ. हरी नरके आहेत, तर ज्येष्ठ इतिहास संशोधक डॉ. जयसिंगराव पवार अध्यक्षस्थानी आहेत. यावेळी बोर्डिंगचे चेअरमन के. जी. पाटील, वैभव नायकवडी उपस्थित राहणार आहेत.’ भारताबाहेरील तज्ज्ञांचे मार्गदर्शन ऑनलाईन मोडमध्ये होईल. डॉ. संजय जाधव (दुबई), सुधीर पेडणेकर (स्वित्झर्लंड) मार्गदर्शन करणार आहेत.