जल जीवन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जल जीवन योजनेची 
अंमलबजावणी पारदर्शक
जल जीवन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक

जल जीवन योजनेची अंमलबजावणी पारदर्शक

sakal_logo
By

जल जीवन योजनेची
अंमलबजावणी पारदर्शक
कार्यकारी अभियंता धोंगे यांचा दावा
सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १५ : जल जीवन मिशनअंतर्गत जिल्ह्यात १२३४ योजनांचा समावेश आहे. यातील १२१७ योजनेत दुरुस्ती व १७ नवीन योजना घेतल्या आहेत. अस्तित्वातील योजनेमधून कमी पाणी मिळत असल्याने सन २०५३ पर्यंतच्या लोकसंख्येस ५५ लिटर्स प्रति माणसीप्रमाणे स्वच्छ पाणीपुरवठा होण्यासाठी योजना घेतल्या आहेत. या योजनेच्या कामात पारदर्शकता असल्याचा दावा कार्यकारी अभियंता अशोक धोंगे यांनी पत्रकाद्वारे केला आहे.
‘जलजीवन’मध्ये १२३४ योजनांपैकी ९८३ योजनांच्या निविदा प्रसिध्द केल्या आहेत. यातील ६६३ योजनांना कार्यारंभ आदेश दिलेले आहेत. सदर योजनांपैकी अंदाजपत्रकीय दरापेक्षा कमी दराने २५, अंदाजपत्रकीय दराने २९४ व उर्वरित ३४४ जादा दराने भरलेल्या आहेत. या निविदांपैकी चालू दरसूचीनुसार अंदाजपत्रकीय दराने १४४ योजनांच्या निवेदन शासनस्तरावरुन मंजुरी दिलेली आहे, तर १३२ योजनांच्या निविदेंना शासन निर्णयानुसार दरसूचीनुसार अंदाजपत्रकीय दराने जिल्हा परिषद स्तरावरुन मान्यता दिलेली आहे.