शिवाजी ट्रेक ट्रेक | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

शिवाजी ट्रेक ट्रेक
शिवाजी ट्रेक ट्रेक

शिवाजी ट्रेक ट्रेक

sakal_logo
By

शिवाजी ट्रेक ट्रेल आजपासून

कोल्हापूर, ता. १८ : देशभरातील एनसीसी छात्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जाज्वल्य इतिहासाचा साक्षीदार असणाऱ्या पन्हाळा -पावनखिंड मार्गावर ट्रेक करणार आहेत. ट्रेकची सुरुवात श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या हस्ते तर ग्रुप कमांडर ब्रिगेडियर समीर साळुंखे यांच्या उपस्थितीत होणार आहे.
एनसीसी महाराष्ट्रमार्फत कोल्हापूर विभाग शिवाजी ट्रेल ट्रेकचे आयोजन करण्यात येते. या ट्रेकचे आयोजन कोल्हापूर विभाग ३३ वर्षे करीत आहे. याची सुरुवात शनिवारी (ता. १९) सकाळी पावणे आठ वाजता एनसीसी भवन येथून होणार आहे. २७ नोव्हेंबरपर्यंत चालणाऱ्या या ट्रेकचे हे ५५ वे वर्ष आहे. यामध्ये महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, राजस्थान, कर्नाटक, गोवा राज्यातील ५२५ छात्रसैनिक सहभागी झाले आहेत, अशी माहिती एनसीसी गटमुख्यालय कोल्हापूरचे अधिकारी कर्नल एस. गणपती यांनी पत्रकार परिषदेत दिली.
पन्हाळा, बांबवडे, शाहूवाडी, पांढरेपाणी, गजापूर (विशाळगड) असा ट्रेकचा मार्ग आहे. विशाळगडावर ट्रेकचा समारोप होणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या इतिहासाची माहिती एनसीसी छात्रांना देणे, असा मुख्य उद्देश या ट्रेकचा आहे. देश, राज्य, कोल्हापूर परिसरातील ऐतिहासिक, सांस्कृतिक माहिती सहभागी छात्रांना करून देण्यासाठी स्थानिक महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. या वेळी प्रशासकीय अधिकारी मेजर गुगामालती ए., सुभेदार मेजर राजाराम वारंग उपस्थित होते.