वाहतूक मार्गात बदल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वाहतूक मार्गात बदल
वाहतूक मार्गात बदल

वाहतूक मार्गात बदल

sakal_logo
By

सैन्य भरतीच्या पार्श्वभूमीवर
वाहतूक मार्गात बदल

सकाळ वृत्तसेवा
कोल्हापूर, ता. १८ : शिवाजी विद्यापीठाच्या क्रीडांगणावर होत असलेल्या सैन्य भरती मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर २१ नोव्हेंबर ते १२ डिसेंबरदरम्यान शहर वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे वाहतूक मार्गात बदल करण्यात आला. सैन्य भरती कार्यालयातर्फे मेळावा होत आहे.
मेळाव्यात राज्यातील कोल्हापूर, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, उत्तर गोवा, दक्षिण गोवा या जिल्ह्यांतील पात्र उमेदवारांची भरती प्रक्रिया होत आहे. भरतीकरिता येणारे उमेदवार त्यांच्या खासगी वाहनाने, एसटी बस, रेल्वेने येणार असून, वाहनांची व लोकांची गर्दी होईल. भरती प्रक्रिया सुरळीत व सुरक्षित होण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, म्हणून वाहतूक मार्गात बदल करण्यात येत आहेत.

* वाहतुकीकरिता बंद करण्यात आलेला मार्ग : सायबर चौक, एनसीसी भवन ते एस.एस.सी. बोर्डपर्यंत इंदिरा सागर चौकाकडे जाणारा मार्ग केएमटी बस व ऑटोरिक्षा वाहने वगळून अन्य सर्व वाहनांना प्रवेश बंद.

* वळविण्यात आलेले मार्ग : सायबर चौकातून शेंडा पार्क, हॉकी स्टेडियमकडे जाणारी वाहने ही सायबर चौकातून एसएससी बोर्ड चौकापर्यंत,
तसेच एसएससी बोर्डकडून सायबर चौकाकडे येणारी जाणारी वाहने ही एकेरी मार्गानेच ये-जा करतील.

* वाहतुकीकरिता बंद व सुरू करण्यात येणारे मार्ग : राजाराम रायफल्स ते प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरमार्गे सायबर चौक येणारा मार्ग हा राजाराम रायफल्स चौकात वाहतुकीकरिता सोयीनुसार बंद व सुरू करण्यात येईल (स्कूलबस, विद्यार्थी वाहतूक रिक्षा, भरती प्रक्रियेकरिता येणारी वाहने वगळून).

* पार्किंग व्यवस्था व मार्ग : भरती प्रक्रियेकरिता येणाऱ्या उमेदवारांनी त्यांची दुचाकी, चारचाकी वाहने प्री आयएएस ट्रेनिंग सेंटरच्या बाजूच्या रस्त्याने, सारथी इमारत येथून राजाराम महाविद्यालयाच्या पटांगणात पार्क करावीत.
- उमेदवार अवजड वाहनांतून आल्यास त्यांनी वाहनांनी राजाराम महाविद्यालयाचे मुख्य प्रवेशद्वार येथून प्रवेश करून राजाराम महाविद्यालयाच्या पटांगणात वाहने पार्क करावीत.