पुस्तके भेट | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पुस्तके भेट
पुस्तके भेट

पुस्तके भेट

sakal_logo
By

गर्ल्स हायस्कूलला पुस्तक देणगी
कोल्हापूर : प्रिन्स शिवाजी मराठा बोर्डिंग हाऊस संचलित गर्ल्स हायस्कूलमध्ये पुस्तक देणगी भेट कार्यक्रम झाला. न्यू कॉलेजचे माजी उपप्राचार्य टी. आर. गुरव प्रमुख पाहुणे, तर मुख्याध्यापिका एच. एच. गोसावी अध्यक्षस्थानी होत्या. इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन गुरव यांनी केले. तसेच, आई धाडूबाई गुरव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ७५ पुस्तके भेट देण्यात आली. जी. एस. पाटील यांनी स्वागत केले. व्ही. यू. नागरगोजे यांनी परिचय करून दिला. वाय. आर. जाधव यांनी सूत्रसंचालन केले. व्ही. एस. शिंदे यांनी आभार मानले.