धनगर समाज मेळावा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

धनगर समाज मेळावा
धनगर समाज मेळावा

धनगर समाज मेळावा

sakal_logo
By

64518
कोल्हापूर ःधनगर समाजाच्या मेळाव्यात बोलताना बबनरान रानगे,बयाजी शेळके, राघु हजारे,सुलोचना नायकवाडे, शहाजी सिदु,बाबुराव बोडके ,सिध्दर्थबने, प्रकाश येडगे, छगन नांगरे.

होळकर यांचे जन्मस्थळ
स्मारक म्हणून घोषित करा
बबन रानगे; धनगर समाज कार्यकर्त्यांचा मेळावा
कोल्हापूर, ता. २४ : वाफगावचा किल्ला यशवंतराव होळकर यांचे जन्मस्थळ आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक म्हणून घोषित करावे, अशी मागणी मल्हार सेनेचे सरसेनापती बबन रानगे यांनी आज येथे केली.
मल्हार सेना, धनगर समाज युवक संघटना व धनगर समाज महासंघाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात ते बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवन येथे मेळावा झाला.
रानगे म्हणाले, ‘‘पुणे जिल्ह्यातल्या किल्ले वाफगाव येथे होळकरांचा जन्म झाला. त्यामुळे हा किल्ला आंतरराष्ट्रीय दर्जाचे स्मारक व्हावे, अशी धनगर समाजाची भावना आहे. सरकार कोणतेही असो धनगर आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी जाणीवपूर्वक टाळाटाळ करण्यात येत आहे. मात्र हा प्रश्न सुटल्याशिवाय आणि हक्काचे आरक्षण मिळविल्याशिवाय धनगर जमात शांत बसणार नाही. त्यासाठी सध्या सुरू असलेली लढाई आणखी व्यापक करण्यात येणार आहे. त्याशिवाय या पुढची रस्त्यावरची लढाई ही कोल्हापुरातून सुरू होणार आहे. त्याची घोषणा लवकरच केली जाईल. समाजाने या लढाईत एकजुटीने सहभागी व्हावे.’’
सेनेचे जिल्हाप्रमुख बयाजी शेळके म्हणाले, ‘‘धनगर जमातीचे प्रश्न सोडवण्यासाठी राजकीय सत्ता फार महत्त्वाची आहे. त्यामुळे राजकीय सत्ता हस्तगत करण्यासाठी तसेच सभागृहातील संख्याबळ वाढवण्यासाठी आपण जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजेत.’’
रामचंद्र रेवडे यांनी समाजाने मागासलेपण घालवण्यासाठी शिक्षणाची कास धरावी, तर शहाजी सिद्ध यांनी धनगर जमातीने सकारात्मक राजकारण करून ग्रामपंचायत, विकास सेवा सोसायटी, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा सर्व सभागृहांमध्ये लोकप्रतिनिधी पाठवावेत, असे आवाहन केले.
माजी उपमहापौर सुलोचना नाईकवडे, बाबूराव बोडके, छगन नांगरे, सिद्धार्थ बन्ने, मायाप्पा धनगर, बापूसाहेब ठोंबरे, राघू हजारे, बाबा धनगर, अनिता लांबोरे यांनी मनोगत व्यक्त केले. या वेळी बाळासाहेब दाईंगडे, प्रकाश येडगे, शामराव माने, लिंबाजी हजारे, भिमराव हराळे, सोमाजी वाघमोडे, शशिकांत पुजारी, मायाप्पा पुजारी, आनंदा देशिंगे, विक्रम वगरे, आनंद धनगर, संजय कट्टीकर, शामराव करपे, सागर बोडेकर उपस्थित होते. भगवान हराळे यांनी आभार मानले.