क्राईम दोन बातम्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

क्राईम दोन बातम्या
क्राईम दोन बातम्या

क्राईम दोन बातम्या

sakal_logo
By

अपघातात दुचाकीस्वार ठार
कोल्हापूर : रुकडी फाट्यावर दुचाकी आणि ट्रॅक्टर ट्रॉलीची धडक होऊन झालेल्या अपघातात दुचाकीस्वार ठार झाला. सुधीर शामराव नामे (वय ४५, रा. मूळ रा. कुंभोज, ता. हातकणंगले, सध्या रा. वर्षानगर, कोल्हापूर) असे त्याचे नाव आहे. कोल्हापूर-सांगली मार्गावर रुकडी फाट्याजवळ दुपारी हा अपघात झाला. याची नोंद सीपीआर पोलिस चौकी झाली. नामे यांच्या मागे आई, वडील, भाऊ, बहीण असा परिवार आहे. पोलिसांनी सांगितले, की सुधीर माने हे कुंभोज येथील शेतीच्या कामानिमित्त आज सकाळी कोल्हापुरातून दुचाकीवरून गावाकडे गेले होते. परत येताना रुकडी फाट्याजवळ माने पेट्रोल पंपासमोर ट्रॅक्टर बाजुला वळला. यावेळी नामे यांच्या दुचाकीचे हँडेल ट्रॉलीत अडकल्याने हा अपघात झाला. डोक्याला गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांना परिसरातील काही नागरिकांनी आणि प्रवाशांनी रुग्णवाहिकेतून सीपीआरमध्ये दाखल केले. उपचारादरम्यान नामे यांचा मृत्यू झाला. उत्तरीय तपासणीनंतर रात्री मृतदेह नातेवाईकांकडे सोपवला. या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली असून, हातकणंगले पोलिसांना अपघाताची माहिती देण्यात आली आहे.