
निखील खाडे
१०८९७
कोल्हापूर :फुटबॉलपटू निखिल खाडेच्या प्रकृतीची चौकशी करताना आमदार ऋतुराज पाटील.
निखिल खाडेवरील उपचाराची जबाबदारी घेऊ
आमदार ऋतुराज पाटील; डी.वाय. अभियांत्रिकीतर्फे सव्वा लाख सुपूर्द
कोल्हापूर, ता. १ : मेंदूची शस्त्रक्रिया झालेला फुटबॉलपटू निखील खाडे याची प्रक्रती चांगली होईपर्यंतची उपचाराची जबाबदारी डी. वाय. पाटील ग्रुप उचलेल, अशी ग्वाही आमदार ऋतुराज पाटील यांनी दिली. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातर्फे सव्वा लाखांची मदत निखिलचे वडील दिलीप खाडे यांच्याकडे सुपूर्द केली. तज्ज्ञ डॉक्टरांसह त्यांनी कुटुंबीयांसोबत उपचाराबाबत चर्चा केली.
आमदार पाटील यांनी, डॉ. संजय डी. पाटील व आमदार सतेज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली डी. वाय. पाटील ग्रुप हा निखिलच्या पाठीशी खंबीरपणे उभा असल्याचे सांगितले. दरम्यान, निखिलवर मेंदूची शस्त्रक्रिया केल्याची माहिती मिळताच आमदार पाटील यांनी तत्काळ रुग्णालयास भेट घेऊन प्रकृतीची विचारपूस केली. आठवडाभर ते त्याच्या कुटुंबीय व डॉक्टरांच्या संपर्कात होते. आजही त्यांनी कुटुंबीयांशी मेंदूवरील तज्ज्ञ डॉक्टरांसोबत निखिलच्या प्रकृतीबाबत चर्चा केली. उपचार व खर्चाची काळजी करू नये. ती जबाबदारी घेऊ. असे सांगून निखिलला मानसिक बळ देऊ, असे आवाहनही केले.
यावेळी डी. वाय. पाटील ग्रुपचे कार्यकारी संचालक डॉ. ए. के. गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे, प्राचार्य डॉ. महादेव नरके, डॉ. लीतेश मालदे, डी. डी. पाटील, मेंदू तज्ज्ञ डॉ. उदय घाटे, दिलीप खाडे, अॅड. अभिजित नलवडे, पवन पाटील, अजित पाटील, प्रा. योगेश चौगले, विराज पसारे, अर्जुन पोवाळकर, अक्षय भोसले उपस्थित होते.
............
ांकोट
डी. वाय. पाटील ग्रुपच्या माध्यमातून आमदार ऋतुराज पाटील यांनी आर्थिक पाठबळासह आधारही दिला. आमदार पाटील व डी. वाय. पाटील ग्रुपच्या भक्कम पाठबळामुळे लढाई धीराने लढत आहे.
- दिलीप खाडे